Home उपक्रम कुरखेडा येथे ‘महाराजस्व समाधान शिबिर’ येत्या ८ मे रोजी…

कुरखेडा येथे ‘महाराजस्व समाधान शिबिर’ येत्या ८ मे रोजी…

    राकेश चव्हाण 

कुरखेडा तालुका प्रतिनिधी 

        तालुक्यातील नागरिक व शेतकरी बांधवांच्या विविध शासकीय कामांना गती देण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर शुक्रवार, दि.०८ मे २०२६ रोजी मंडळ अधिकारी कार्यालय, कुरखेडा येथे पार पडणार आहे.

         या शिबिरात महसूल व इतर शासकीय सेवांशी संबंधित प्रलंबित कामे तत्काळ निकाली काढण्यावर भर देण्यात येणार आहे. गुरनोली, गेवर्धा, नांन्हि, कुरखेडा, तळेगाव व गोंठणगाव या गावांतील नागरिकांना विशेषतः या शिबिराचा लाभ मिळणार आहे.

         शिबिरात शेती विषयक कामे,प्रलंबित व वारस फेरफार प्रकरणे (मयत वनहक्क पट्टेदारांचे फेरफार समावेश)७/१२ मधील दुरुस्ती, डिजिटल ७/१२ व ई-नमुना वाटप,वर्ग-२ जमीन वर्ग-१ मध्ये रूपांतर व इतर अर्ज, विद्यार्थ्यांसाठी दाखले उत्पन्न, जात,नॉन-क्रीमिलेयर प्रमाणपत्र,अधिवास (Domicile) व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र,शेतकरी प्रमाणपत्र इतर योजना व सेवा,लक्ष्मी मुक्ति योजना, संजय गांधी निराधार योजना नवीन शिधापत्रिका (रेशन कार्ड) व वाटप,जन्म-मृत्यू नोंदणी तसेच ‘सर्वांसाठी घर’ योजना तसेच शेतकऱ्यांसाठी विशेष आवाहन ज्यांच्या ७/१२ वर मयत व्यक्तींची नावे आहेत, त्यांनी वारस नोंदणीसाठी आवश्यक अर्ज तातडीने तलाठी कार्यालय, कुरखेडा येथे जमा करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

        तरी तालुक्यातील सर्व नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कुरखेडा चे उप विभागीय अधिकारी प्रसन्नजीत प्रधान,तहसीलदार राहुल पाटिल, मंडळ अधिकारी यांचे कडून करण्यात आले आहे.