राजेंद्र रामटेके
कुरखेडा तालुका प्रतिनिधि
कुरखेडा येथे भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १३३व्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचे प्रक्षेपण उत्साहात पार पडले. भारतीय जनता पक्षाच्या वतीने हा कार्यक्रम कुरखेड्यातील एका चहाच्या स्टॉलवर आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टी चे तालुका अध्यक्ष माजी पंचायत समिती सदस्य चांगदेव फाये , कुरखेडा नगरपंचायतचे सभापती भाजप शहराध्यक्ष सागर निरंकारी, अनुसूचित जाती मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष ऍड उमेश वालदे,भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष उल्हास देशमुख, लक्ष्मण चहा स्टॉलचे संचालक लक्ष्मण धुळसे मनीष बनसोड विशाल धुळसे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाच्या सूचनेनुसार मन की बात चे कार्यक्रम हे सार्वजनिक जागा चहाचे स्टॉल कार्यकर्त्यांच्या घरी अशा ठिकाणी कार्यक्रम घेऊन सक्रिय सहभाग झाला पाहिजे अशा सूचना देण्यात आल्या. या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी कुरखेडा च्या वतीने हा कार्यक्रम करण्यात आला.
मन की बात सारख्या कार्यक्रमाच्या स्वरूपांना प्रोत्साहन दिले पाहिजे कारण की सामूहिक सहभाग आणि संवादाला प्रोत्साहन देते. त्यामुळे नाविन्यपूर्ण जागेवर मन की बात चे कार्यक्रम भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात येईल. असे भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष चांगदेव फाये यांनी सांगितले आहे.
‘मन की बात’ हे एक महत्त्वाचे व्यासपीठ असून, त्याद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील नागरिकांशी संवाद साधतात. या माध्यमातून राष्ट्रीय महत्त्वाच्या सामाजिक समस्या, विकासात्मक उपक्रम आणि प्राधान्याच्या मुद्द्यांवर थेट संवाद साधला जातो. केंद्र स्तरावर दिले जाणारे संदेश तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘मन की बात’ ही एक प्रभावी संधी ठरते.
म्हणूनच, प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी होणाऱ्या या कार्यक्रमात जास्तीत जास्त पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिकांनी सहभागी होणे गरजेचे आहे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.



