राजेंद्र रामटेके
कुरखेडा तालुका प्रतिनिधी
प्रतिकूल परिस्थितीतही जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यश मिळवता येते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे कुरखेडा येथील तेजस हेमचंद नेवारे,त्यांची महाराष्ट्र पोलीस दलातील राज्य राखीव पोलीस बल (SRPF) मध्ये निवड झाल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.
तेजस यांचे वडील श्री. हेमचंदजी नेवारे हे प्रेसचे छोटेसे दुकान चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात, तर आई सौ.चंद्रीका भाजीपाला विकून घराला हातभार लावतात. आर्थिक परिस्थिती अत्यंत कठीण असतानाही तेजस यांनी हार मानली नाही. दिवसभर वडिलांच्या दुकानात काम करत, आईला मदत करत आणि उरलेल्या वेळेत अभ्यास व शारीरिक तयारी करत त्यांनी आपले स्वप्न जपले.
त्यांच्या या अथक परिश्रम, जिद्द आणि संघर्षामुळेच त्यांनी SRPF मध्ये निवड मिळवली. तेजस यांच्या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, अनेक तरुणांसाठी तो प्रेरणादायी ठरत आहेत. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी गोठणगाव ग्रामपंचायत प्रशासक तथा जेष्ठ पत्रकार राम लांजेवार,दैनिक लोकमत तालुका प्रतिनिधी सिराज पठाण,पी.एस.आय.ताराम सर,वॉइस ऑफ़ मिडीया चे राकेश चव्हाण व मित्रमंडळ यांनी शुभेच्छां देत अभिनंदन केले.या प्रसंगी त्याची आई सौ.चंद्रीकाताई हिचा मुलाचा सत्कार बघून आनंद गगनात मावेनासा झाला.



