बाळासाहेब सुतार
निरा नरसिंहपुर प्रतिनिधी...
अल फत्तेह कुस्ती केंद्र आयोजित लुुमेवाडी तालुका इंदापूर येथे ,”सुफी संत हाफीसाहब बाबांच्या पावन भूमीत,पहिल्यांदाच निकाली कुस्त्याचे जंगी मैदान भरवण्यात आले.हजारो कुस्ती मल्लांची उपस्थिती लाभली.
मैदानामध्ये एक नंबरची कुस्ती महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी पैलवान सिकंदर शेखने,हैदराबादचा पैलवान मुसा खान यांचा पराजय करून विजय मिळवला.यामुळे त्यांना सन्मानार्थ रुपये 3 लाख 51 हजार रुपये इनाम व चांदीची गदा देण्यात आली. मानकरी ठरला.
महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख कुस्ती आखाड्यामध्ये बोलत आसताना म्हणाले की कुस्ती आखाडा हा वेळेत भरवीला पाहिजे.दुपारी 2 वाजल्या पासून ते रात्री 9 वाजेपर्यंत कुस्त्या घ्याव्यात,कारण जीवनातील आहार व आराम आणि व्यायाम वेळेत मिळत नाही.म्हणूनच वेळेचे बंधन पाळावे ही काळाची गरज आहे.
मल्ल सम्राट महाराष्ट्र केसरी रावसाहेब आप्पा मगर सह सर्व नामांकित पैलवान व लुमेवाडी परिसरातील हजारो ग्रामस्थ आणि कुस्ती शौकीन उपस्थित होते .
कुस्ती मैदानाचे आयोजक अल्ला कुस्ती केंद्र लुमेवडी व तरुण सहकारी कार्यकर्ते आणि समस्त ग्रामस्थ लुमेवाडी यांच्या मार्गदर्शनाने मैदान यशस्वीपणे पार पाडण्यात आले.
स्पर्धा परीक्षेसाठी प्रथम क्रमांकाला 51 हजार व चांदीची गदा तर द्वितीय क्रमांकला 31 हजार व चषक तसेच तृतीय क्रमांकाला 21000 तर चौथ्या क्रमांक 11000 हजार रुपये इनाम देण्यात आला.
या कुस्ती मैदानामध्ये 100 रुपये पासून ते चांदीची गदा व 3 लाख 51 हजार रुपये इनामाच्या कुस्त्या लावण्यात आल्या.
कुस्ती मैदानाचे आयोजक लुमेवाडी ग्रामस्थ आणि पदाधिकारी माजी सरपंच शब्बीर शेख, मुसाभय पठाण,मंजूरभाई मुलानी,सद्दाम जमादार,शरीफ पठाण,तय्यब मुलानी,जाकीर शेख,मोईन शेख ,तोसीक शेख,वाहित शेख,सत्तार शेख ,अरबाज शेख.
कुस्ती मैदान यशस्वीपणे पार पाडण्या साठी वस्ताद असलम मुलानी निमगाव केतकी तसेच एजाज फक्रुद्दीन शेख कृषी अधिकारी यांचेही कुस्ती आखाड्याला मोलाचे सहकार्य लाभले.
निकाली कुस्ती आखाड्यासाठी निवेदक म्हणून शरद होळकर व प्रवीण ठवरे यांनी काम पाहिले.



