Home क्रीडा प्रत्येक कुटुंबात, घराघरात एक तरी पैलवान असावा :- माजी मंत्री हर्षवर्धन पाटील…....

प्रत्येक कुटुंबात, घराघरात एक तरी पैलवान असावा :- माजी मंत्री हर्षवर्धन पाटील…. — नरसिंह जयंती उत्सवा निमित्त भव्य आणि दिव्य निकाली कुस्त्याचे करण्यात आले आयोजन….

  बाळासाहेब सुतार 

निरा नरसिंहपुर प्रतिनिधी 

        नरसिंहपूर या ठिकाणी भरलेल्या जंगी मैदानात निकाली कुस्त्यांचा थरारक पाहण्यासाठी हजारो कुस्ती प्रेमींनी मोठी गर्दी केली होती.

        नरसिंहपूर येथील कुस्ती आखाड्यामध्ये माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील उपस्थित राहून बोलत असताना म्हणाले की,मल्ल सम्राट महाराष्ट्र केसरी रावसाहेब आप्पा मगर यांचे राज्यामध्ये प्रत्येक कुस्ती मैदानाला योगदान असते आप्पांचा विचार डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक घराघरात एक तरी पैलवान नावा रूपाला आनावा. तसेच तरुण कार्यकर्त्यांनी कुस्तीची परंपरा जोपासत आजुनही कायम चालू ठेवलेली आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे उद्गार. 

        एक नंबरची कुस्ती पैलवान सतपाल सोनटक्के विरुद्ध पैलवान कालीचरण सोलंकर.यांच्या कुस्तीचा चांगलाच थरारक पाहून कुस्ती जोड सोडण्यात आली. 

        या कुस्ती आखाड्यामध्ये शंभर रुपये पासून ते 51 हजार रुपये नामाचा कुस्त्या लावण्यात आल्या.

        कुस्ती मैदानासाठी प्रमुख उपस्थिती माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, महाराष्ट्र केसरी मल्ल सम्राट रावसाहेब आप्पा मगर, अमर भैया जगदाळे, संचालक उदयसिंह पाटील, व्हाईस चेअरमन दादासाहेब घोगरे, उद्योजक सागर इंगळे, सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

         सकाळ पासूनच मैदानात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, अशा विविध भागांतील नामांकित मल्लांनी निकाली कुस्त्यासाठी सहभाग घेतला होता. प्रत्येक कुस्ती अत्यंत चुरशीची होत असल्याने प्रेक्षकांनी जल्लोषात आनंद व्यक्त केला. विशेषतः काही प्रमुख लढतींमध्ये मल्लांनी आपले कौशल्य, ताकद आणि डावपेच यांचे उत्कृष्ट प्रदर्शन केले.

        या कुस्ती मैदानाचे आयोजन नरसिंहपूर यात्रा कमिटी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष, पोलीस पाटील, विविध संस्थांचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, वस्ताद, समस्त ग्रामस्थ नरसिंहपुर, आणि लक्ष्मी नरसिंह जयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले होते. पारंपरिक खेळांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा निकाली कुस्त्यांचा उपक्रम राबवण्यात आला असल्याचे आयोजकांनी सांगितले.

       नरसिंह जयंती निमित्त आयोजित या कार्यक्रमामुळे परिसरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते. 

        निकाली कुस्त्या जोडण्याचे काम व निवेदक म्हणून पैलवान युवराज केचे यांनी काम पाहिले.