Home Social श्री संत गोरोबा काका च्या पुण्यतिथि निमीत्त व वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज...

श्री संत गोरोबा काका च्या पुण्यतिथि निमीत्त व वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती महोत्सव निमित्त विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन…

    राकेश चव्हाण 

कुरखेडा तालुका प्रतिनिधी 

        दरवर्षीप्रमाणे यंदाही संत शिरोमणी गोरोबा काका कुंभार यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कुरखेडा येथे विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

         कार्यक्रमाची रुपरेषा दि. १५ एप्रिल २०२६ रोजी बुधवारी दिवसभर विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. सकाळी ९.०० वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून सायंकाळी ५.०० वाजता घटस्थापना होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ६.३० वाजता सामूहिक प्रार्थना, सायंकाळी ७.०० वाजल्यापासून हरिपाठ आणि रात्री ८.०० वाजता वृध्द कलाकार संघटना यांचे भजन प्रबोधन सह भजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

         तसेच गुरुवारी दुपारी २.०० वाजता गोपालकाला कार्यक्रम होणार असून सायंकाळी ६ ते १० वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

        या कार्यक्रमाचे आयोजन श्री संत शिरोमणी गोरोबा काका कुंभार समाज, राणा प्रताप वॉर्ड, कुंभार मोहल्ला तसेच गावकरी मंडळी, कुरखेडा यांच्या वतीने करण्यात आले असून सर्व भाविकांनी उपस्थित राहून कार्यक्रमास यशस्वी करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.