Home Maharashtra महिलांना केलेल्या कामाचा मोबदला मागण्यास रस्त्यावर उतरावे लागते,यामुळे शासनाला याची लाज कशी...

महिलांना केलेल्या कामाचा मोबदला मागण्यास रस्त्यावर उतरावे लागते,यामुळे शासनाला याची लाज कशी वाटत नाही.:- प्रा.कॉ.रमेशचंद्र दहिवडे..

ऋषी सहारे

   संपादक 

गडचिरोली :- करोना काळाच देशात सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मनुष्य रस्त्यावर फिरत नव्हता. मुलगा बापाच्या भेटीला नव्हता, तर बाप मुलाच्या भेटीला जात नव्हता. कोणाला करोना झाला तर त्याचे कोणीही नातेवाईक पहायला जात नव्हते.

          ज्याला करोना झाला त्याला कुत्र्यापेक्षा नीच वागणूक दिल्या जात होती अशा अवस्थेत करोना महामारी निर्मूलनाचे काम अंगणवाडी महिलांनाआले आणि दरमहा 1000₹. करोना संपेपर्यंत देण्यात येईल असे सांगून अंगणवाडी सेविका मदतनीस, आशा व गटप्रवर्तक तसेच अर्धवेळ स्त्री परिचर यांच्याकडून 24 महीने काम करून घेण्यात आले आणि केवळ एक हजार रुपये देण्यात आले.

         23 महिन्याचे 23 हजार रुपये थकीत आहे वर्षे लोटूनही ते मिळाले नाही. थकीत कोरोना भत्ता तात्काळ द्या! या मागणीला घेऊन आज जिल्हा परिषदेसमोर अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने धरणा कार्यक्रम करण्यात आला. 

      थकीत कोरोना भत्ता तात्काळ द्या! फसवेगिरी बंद करा! केलेल्या कामाचा मोबदला मिळालाच पाहिजे. संघर्ष हमारा नारा है, भावी इतिहास हमारा है! अशा गगनभेदी घोषणा देण्यात आल्या.

         मार्गदर्शन पर भाषणात प्रा.कॉ.रमेशचंद्र दहिवडे म्हणाले, काम करून घ्यायचे आणि काम झाल्यावर तोंड लपवायचे. अशी या शासनाची रीत आहे. मंदिर बांधण्यासाठी आणि कुंभमेळ्याला करोडो रुपये दिले जातात. मात्र दुर्बल घटकातील कष्टकऱ्यांना जे काम केले, त्याचा मेहनताना देण्यासाठी पैसे नाही. हे आम्ही खपवून घेणार नाहीत.

        या प्रसंगी कॉ.अरुण लाटकर,नागपूर, अमोल मारकवार, सुनंदा बावणे, कॉ.अरुण भेलके स्त्री परिचरच्या उपस्थित होते.

         अमोल मारकवार म्हणाले, आज ही आमची संघर्षाची सुरुवात आहे.मोबदला देण्यात यावा असे चार पत्र मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी काढले, मग मोबदला का मिळाला नाही? पत्राची अंमलबजावणी करायची नव्हती तर पत्र कशाला काढले असा सवाल मार्क्सवादी का म्हणूनच पक्षाचे जिल्हा सेक्रेटरी कॉम्रेड अमोल मारकवार यांनी केला.

         कॉ. अरुण भेलके म्हणाले, अच्छे दिन येणार म्हणून नागरिकांना सांगितले होते आणि आम्ही पाहतो अच्छे दिन केवळ मंदिर, रूढीपारंपरा, ढोंगी बाबांना यांचे आले. त्यांचे संपत्तीत करोडो ने वाढ झाली.

           अरुण भेलके व अमोल मारकवार यांचे नेतृत्वात शिष्टमंडळ मुख्य कार्यपालन अधिकारी यांना मिळाले व मागण्याचे निवेदन सादर केले. सूत्रसंचालन, आभार मानले.

           कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता उज्वला उंदीरवाडे, ललिता केदार, विठाबाई भट, सुमन टोकलवार रंजना टेंभुर्णे, छाया रामटेके, विठोबा एकोनकर, भारती रामटेके, भागीरथा दूधबावरे, कौशल्या गौरकार, माया शेडमाके, बेबीताई त्रिनगरीवार, संगीता वडलाकोंडावार यांनी विशेष परिश्रम घेतले.