Home Social जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नवनियुक्त संचालक श्रीकांत नागीलवार, नीलिमाताई मेश्राम यांचा सत्कार…

जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नवनियुक्त संचालक श्रीकांत नागीलवार, नीलिमाताई मेश्राम यांचा सत्कार…

     राकेश चव्हाण 

कुरखेडा तालुका प्रतिनिधि 

         दि गडचिरोली मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदी श्रीकांत व्यंकटी नागीलवार व नीलिमाताई वसंतराव मेश्राम यांची अविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा प्राचार्य नरेंद्र आरेकर यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.

          या सत्कार सोहळ्याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष तथा माजी पं.स.सदस्य चांगदेव फाये , जिल्हा सहकारी बोर्डाचे अध्यक्ष वसंतराव मेश्राम, सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी आबाजी आत्राम सर, आत्राम मॅडम, दरवडे मॅडम, खुशाल मेश्राम तसेच इतर मान्यवर मंडळी उपस्थित होते.

         यावेळी उपस्थित मान्यवरांनी निवड झालेल्या संचालकांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.