बाळासाहेब सुतार
निरा नरसिंहपुर प्रतिनिधी…
टाकळी तालुका माढा येथे कैलासवासी झुंजार सोलनकर वस्ताद यांच्या सातवे पुण्यस्मरणा निमित्त निकाले कुस्त्याचे जंगी मैदान भरविण्यात आले.सोलापूर,पुणे,सातारा,सांगली,कोल्हापूर आधी जिल्ह्यातून हजारो पैलवानांची उपस्थिती.
इनाम 50 रुपये पासून ते 1 लाख 51 हजार इनाम रुपयेच्या कुस्त्या आखाड्यामध्ये लावण्यात आल्या.
कुस्ती आखाड्याचे संयोजक कै.झुंजार देवराव सोलनकर कुस्ती उत्सव कमिटी टाकळी टे. तसेच या आखाड्याचे प्रमुख आयोजक साखर कारखान्याचे संचालक हिम्मत भाऊ सोलनकर यांच्या मार्गदर्शना खाली कुस्ती आखाड्याचे आयोजन करण्यात आले.
संचालक हिम्मत भाऊ सोलनकर कुस्ती आखाड्यामध्ये बोलत आसताना म्हणाले की.कैंलासवासी झुंजार वस्ताद यांचा आशीर्वाद व टाकळी गावाने दिलेला विश्वास आणि तरुण कार्यकर्त्यांचं सहकार्य आसल्यामुळेच मी आज पर्यंत कुस्ती मैदान यशस्वीपणे पार पाडत आलेलो आहे.इथून पुढेही असेच सहकार्य आणि साथ मिळावी असे वक्तव्य संचालक हिम्मत भाऊ सोलनकर यांनी केले.
कुस्ती आखाड्याचे पूजन संतोष महाराज मलवडी तालुका करमाळा व सर्जीराव चौरे सह कुस्ती कमिटी यांच्या हस्ते श्रीफळ फोडून कुस्ती आखाड्याला प्रारंभ करण्यात आला.
सालाबाद प्रमाणे कैं.झुंजार सोलनकर वस्ताद यांच्या पुण्यस्मरणाचे औचित्य साधून निकाली कुस्त्याचे जंगी मैदानही भरविण्यात आले. या कुस्ती मैदानासाठी प्रमुख उपस्थिती नामदेव महाराजांचे वंशज ह भ प माधव महाराज नामदास, व महाराष्ट्र केसरी मल्ल सम्राट रावसाहेब आप्पा मगर,सभापती विक्रम दादा शिंदे,प्रदीपमामा जगदाळे,नामदेव नाना वाघमारे,छोटा रावसाहेब मगर,सरर्जीराव चौरे,आसलम काझी,सुनील बोडके,कुस्ती निवेदक युवराज तात्या केचे,सह सर्व मान्यवर उपस्थिती होते.
प्रसिद्ध कुस्ती मैदानासाठी मोठ्या संख्येने पैंलवानांची उपस्थिती लाभल्याने निकाली कुस्त्याला चांगलाच प्रतिसाद मिळाला.
एक नंबरची कुस्ती पैं. कालीचरण सोलनकर विरुद्ध पैं दादा शेळके यांची इनाम रुपये 1 लाख 51 हजाराची कुस्ती आखाड्यामध्ये सभापती विक्रम दादा शिंदे,छोटा रावसाहेब मगर,आसलम काझी,जिल्हा परिषद सदस्य शिवाजी कांबळे,माजी जिल्हा परिषद शिवाजी पाटील,उद्योजक कैलास पिसाळ,सर्जेराव चौरे,मच्छिंद्र आबा ठवरे,संचालक हिम्मत भाऊ सोलनकर,किसन पाटील,काका पाटील या मान्यवरांच्या हस्ते कुस्ती लावण्यात आली.
पारंपरिक पद्धतीने कुस्त्यांचा थरार रंगला.लहान गटांपासून ते नामांकित मल्लांपर्यंत 200 हुण अधिक निकाली कुस्त्या लावण्यात आल्या.प्रत्येक कुस्तीमध्ये खेळाडूंनी जोरदार खेळ दाखवित प्रेक्षकांची मने जिंकली .
त्यामुळे पैंलवान कुस्ती शौकिन मल्लांमध्ये विशेष उत्साह पाहावयास मिळाला.आखाड्यासाठी पंच म्हणून आमर भया जगदाळे,पंकज पाटील,नानासो सोलनकर,सुनील बोडके,आप्पा सलगर,विजय माने,बाळासाहेब काळे,शिवाजी काळे,रवींद्र शेंडगे,संदीप काळे,बिभीषण सूळ,आधी सर्वांनी काम पाहिले.
कुस्ती आखाड्यासाठी अर्थ कमिटी म्हणून,कांतीलाल राजमाने,किसन पाटील,दादासाहेब पिसाळ,भारत माने,बाळासाहेब सोनवणे,यांनी काम पाहिले.
आखाड्या मध्यील 2026 चा जीवन गौरव पुरस्काराचे मानकरी नामदेव महाराजांचे वंशज हभप माधव महाराज नमदास, व उद्योजक कैलास बापू पिसाळ,यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.तर नेता आप्पा पिसाळ यांनी कुस्ती मैंदानाचे कंट्रोल म्हणून काम पाहिले.
निकाले कुस्त्या भरविण्यात आल्यामुळे टाकळी परिसरात उत्सवी वातावरण निर्माण झाले आसून कुस्ती प्रेमींना पारंपरिक खेळाचा मनसोक्त आनंद घेता आला.
कुस्ती आखाड्यामध्ये कुस्त्या जोडण्याचे काम महाराष्ट्र केसरी मल्ल सम्राट रावसाहेब मगर (आप्पा) यांनी पाहिले तर निवेदक म्हणून पैलवान युवराज केचे यांनी काम पाहिले.
एक नंबरची कुस्ती जोडीवर सोडून कुस्ती मैंदान यशस्वीपणे पार पाडण्यात आले.


