Home Breaking News ब्रेकिंग न्यूज… — पत्रकार विलास मोहिनकर यांना चिमूर पोलिसांनी घेतले ताब्यात…. ...

ब्रेकिंग न्यूज… — पत्रकार विलास मोहिनकर यांना चिमूर पोलिसांनी घेतले ताब्यात…. — अटकपूर्व जामीन घेणार नाही,न्यायालयीन लढाई लढणार :- पत्रकार विलास मोहीनकर…

प्रदीप रामटेके

  मुख्य संपादक

     चिमूर तालुकातंर्गत पाच पत्रकारांवरील खंडणीचे प्रकरण बरेच गाजले असून,याच प्रकरणाला अनुसरून पत्रकार विलास मोहिनकर यांना चिमूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

         पत्रकार विलास मोहिनकर यांची वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर त्यांना जिल्हा सत्र न्यायालय वरोरा येथे हजर करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

       याचबरोबर खंडणी प्रकरणाची सत्यता पडताळून पाहण्यासाठी तथा अधिक चौकशीसाठी चिमूर पोलिस पिसीआर मागण्याची दाट शक्यता आहे.

         मात्र,पत्रकार विलास मोहिनकर यांनी अटकपूर्व जामीन घेण्यास नकार दिला होता.तात्पूरती जमानत घेण्यापेक्षा कायम जमात घेण्याकडे त्यांचा कल होता.

       म्हणूनच खंडणीच्या प्रकरणाची न्यायालयीन लढाई लढण्यावर त्यांचा भर होता.यामुळे पत्रकार विलास मोहिनकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती.

        पत्रकार विलास मोहिनकर हे अभ्यासू आणि अनुभवी पत्रकार असल्याने ते पुढील दिशा काय घेतात आणि चिमूर पोलिस प्रकरणाला नेमके वळण काय देतात हे आज सायंकाळपर्यंत समजेलच!