उपक्षम रामटेके
मुख्य कार्यकारी संपादक
एका तरुण युवकाचा मृतदेह चिमूर येथील बालाजी सागरमध्ये तरंगताना कामगारांना दिसून आला आणि चिमूर शहरात खळबळ उडाली.
सदर युवकाच्या तरंगणाऱ्या मृतदेहाची माहिती चिमूर पोलीस स्टेशनला कर्तव्यावर असलेल्या अधिकाऱ्यांना व पोलीस कर्मचाऱ्यांना देण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच ठाणेदार दिनेश लबडे हे आपल्या ताफ्यासह बालाजी सागर येथील घटनास्थळी दाखल झाले.
पाण्यावर तरंगणाऱ्या सदर युवकाचा मृतदेह बाहेर काढल्यानंतर त्यांचे खिसे तपासले असता खिशात आधार कार्ड दिसून आले.आधार कार्ड बघितल्यावर तो तरुण श्री.राकेश पत्रु डांगे असल्याचे स्पष्ट झाले.
त्यांचे वय ३६ वर्षे असून तो राहणार उरकुडपार,ता.चिमूर,जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असलेल्या निष्पन्न झाले.
तो फरार असल्याची तक्रार कालच चिमूर पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली होती.मात्र पोलिसांनी शोध घ्यायच्या पहिलेच त्याचा मृतदेह चिमूर येथील बालाजी सागर येथे दिनांक ३० मार्च २०२६ रोज सोमवारला आढळून आलाय.
घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी चिमूर ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.यानंतर सदर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.
श्री.राकेश पत्रु डांगे यांच्या मृत्यू पश्चात पत्नी,मुले आहेत.घटनेचा अधिक तपास ठाणेदार दिनेश लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.



