शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
चिमूर येथे आयोजित भव्य ‘काँग्रेस कार्यकर्ता मेळावा’ आणि ‘पक्षप्रवेश सोहळा’ आज दिनांक २७ मार्च २०२७ रोज शनिवारला उत्साहात पार पडला.यावेळी भाजपसह विविध पक्षांतील शेकडो पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या विचारधारेवर विश्वास ठेवून पक्षात जाहीर प्रवेश केला.
पक्षनिष्ठा विसरून विश्वासघात करणाऱ्यांना जनताच धडा शिकवेल आणि येणाऱ्या काळात चिमूर विधानसभा क्षेत्रात काँग्रेसचा विजयाचा इतिहास रचला जाईल,असा आम्हाला विश्वास आहे असे मत माजी मंत्री तथा आमदार विजयभाऊ वडेट्टीवार व्यक्त केले.
सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या धोरणांमुळे आज राज्य कर्जबाजारी झाले असून महागाई आणि बेरोजगारीने सामान्य जनता होरपळून निघत आहे.आरक्षणाच्या मुद्द्यावरही सरकार बहुजनांच्या हक्कावर गदा आणण्याचे षड्यंत्र रचत आहे.अशा परिस्थितीत सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आमचे नेते राहुल गांधीजी जो लढा देत आहेत,त्याला बळ देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत असेही विधिमंडळ पक्षनेते आमदार विजयभाऊ वडेट्टीवार म्हणाले.
ते पुढे मार्गदर्शन करताना म्हणाले की,चिमूर हे माझे हक्काचे घर आहे आणि इथल्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत.आजच्या मेळाव्याला लाभलेली हजारोंची उपस्थिती हेच दर्शवते की,चिमूरच्या जनतेने आता परिवर्तनाचा ध्यास घेतला आहे.
यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा विजयभाऊ वडेट्टीवार यांनी दिल्या !
मेळाव्याला विधिमंडळ पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार,तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष विजय गावंडे पाटील,जेष्ठ नेते प्रा.राम राऊत,धनराज मुंगले,जुनेद खान,माजी जिल्हा परिषद सदस्य विजूभाऊ घरत,किशोर शिंगरे,गजानन बुटके,संजय घुटके,राजू लोणारे,सचिन गाडीवार,विनोद बोरकर,खेमराज मरसकोल्हे,प्रमोद चौधरी,प्रणया गड्डमवार,वनिता मगरे,विवेक कापसे,राजू कापसे,राजू लोणारे,प्रशांत डवले यांच्या सह इतर पदाधिकारी उपस्थित होते.








