Home Maharashtra पाच पत्रकारांवर खंडणीचे आरोप करणारा कुमार प्रथम संजय बाळबुधे खरोखरच व्यवसायिक आहे...

पाच पत्रकारांवर खंडणीचे आरोप करणारा कुमार प्रथम संजय बाळबुधे खरोखरच व्यवसायिक आहे काय? — त्याच्यासह इतरांचे CDR मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तपासले पाहिजे,असेच गंभीर प्रकरण… — चिमूर विधानसभा मतदारसंघातंर्गत मागील ११ वर्षांपासून वाळू व मुरुमांचे अवैध उत्खनन खरबो रुपयांच्या घरात झाले असताना अधिकारी व आमदार चुप कसे? — खंडणी,अवैध धंदे आणि रोष म्हणजे काय? अधिकारांचा सद्उपयोग की दुरुपयोग? त्या पत्रकार संघटनेचे पदाधिकारी कुठे आहेत?

प्रदीप रामटेके

  मुख्य संपादक

         कुमार प्रथम संजय बाळबुधे रा.वढाळा (पैकू),ता.चिमूर येथील रहिवासी असून तो भाजपचा कार्यकर्ता आहे.तद्वतच चिमूर येथील भाजपाच्या वजनदार पदाधिकाऱ्यांकडे तो काम करतो असेही पुढे आले आहे.सदर भाजपाचा पदाधिकारी आमदार किर्तीकुमार भांगडिया यांच्या अगदी जवळचा असल्याचेही निदर्शनास आले आहे…

         पाच पत्रकारांवर खंडणीचे आरोप करणारा कुमार प्रथम संजय बाळबुधे हा खरोखरच व्यवसायीक आहे का?,तो कुठला व्यवसाय करतो? त्याचे वय काय? त्याचे व्यवसायाचे ठिकाण काय आहे? व्यवसायात त्याची गुंतवणूक किती रुपयांची आहे? याचा तपास चिमूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिनेश लबडे यांनी वेळेत करायला हवा होता,मात्र असे न करताच पाच पत्रकारांवर खंडणीचा गुन्हा दाखल करुन ते मोकळे झाले…

          पाच पत्रकारांवर खंडणीचे गुन्हे दाखल करण्यासाठी चिमूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ठाणेदार दिनेश लबडे यांच्यावर कुणी प्रत्यक्ष व फोनद्वारे दबाव आणला होता काय? कुणाकुणाचे त्यांना फोन गेले? याबाबत सुध्दा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाणेदार दिनेश लबडे यांचे सर्व प्रकारच्या फोन काॅलचे व कुमार प्रथम संजय बाळबुधे याच्या फोन काॅलचे CDR तपासले पाहिजे,अशी मागणी पत्रकारांची आहे… 

          याचबरोबर पाच पत्रकारांवर खंडणीचा गुन्हा दाखल व्हावा म्हणून दिनांक २४ मार्च २०२६ ला,ठाणेदार दिनेश लबडे यांच्या भेटीला पोलिस स्टेशन चिमूर येथे कोण कोण गेले होते याबाबत सिसिटिव्ही कॅमेरांचे फुटेज सुध्दा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चेक करण्याचे आदेश दिले पाहिजे,या मताची चिमूर तालुक्यातील जनता आहे.

          कारण कुमार प्रथम संजय बाळबुधे यांच्या नावाने ट्रॅक्टर,ट्रक,व इतर वाहणे नसल्याचे दिसून आले.याचबरोबर तो कोणत्या मटेरियलचा पुरवठा करतोय यासंबंधाने त्याच्याकडे लायसन्स नसल्याचेही समोर आले आहे.मग कुमार प्रथम संजय बाळबुधे हा कसा काय पत्रकारांवर खंडणीचा आरोप करतोय,हा प्रश्न पडतो आहे…

         तद्वतच कुमार प्रथम संजय बाळबुधे ला खंडणीचा आरोप करायला लावणारे कोण आहेत? याचा छडा चिमूर पोलिस ठाण्याचे ठाणेदार दिनेश लबडे यांनी लावला पाहिजे,या मताची चिमूर तालुक्यातील जनता आहे.

माफीया द्वारे सर्रास अवैध उत्खनन….

         चिमूर विधानसभा मतदारसंघातंर्गत मागील ११ वर्षांपासून वाळू व मूरुमाचे अवैध उत्खनन मोठ्या प्रमाणात माफीया द्वारे सुरू आहेत.चिमूर तालुक्यासह नागभिड तालुक्यातील अधिकाऱ्यांनी आजातागायत फौजदारी कारवाई स्थानिक अवैध उत्खनन करणेवाल्या माफीयांवर केली नाही,वाळू व मूरुम भरलेले ट्रक्टर,ट्रक जप्त करुन ठेवले नाही,हे कटू सत्य आहे…

        आजच्या वर्तमान स्थितीत सुध्दा चिमूर विधानसभा मतदारसंघातंर्गत वाळूचे व मुरुमाचे अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरु असताना ठाणेदार दिनेश लबडे यांच्यासह महसूल अधिकारी,आमदार किर्तीकुमार भांगडिया चुप बसून आहेत..‌.

     आमदार किर्तीकुमार भांगडिया आणि संबंधित अधिकारी हे अवैध उत्खनन करणाऱ्या वाळू व मूरुम माफीयाकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष का म्हणून करतात याचे गुपित जनतेसमोर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणायला पाहिजे,अशा जनभावना चिमूर तालुक्यातील जनतेच्या आहेत.

दारु विक्री व सट्ट्यांचे अवैध धंदे….

     चिमूर तालुकातंर्गत अवैध दारू विक्रीचे व सट्ट्याचे अड्डे मोठ्या प्रमाणात सुरू असताना ठाणेदार दिनेश लबडे,आमदार किर्तीकुमार भांगडिया चुपचाप व शांत आहेत.त्यांना त्यांच्या योग्य व उत्तम कर्तव्याची जाणीव नसल्यासारखे ते वागताहेत याला काय म्हणावे?

           यामुळे अवैध धंदे हे कुणाच्या छत्रछायेखाली सुरू आहेत याची तसदी आमदार किर्तीकुमार भांगडिया आणि चिमूर ठाणेदार दिनेश लबडे हे घेत नसतील तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी,”चिमूर तालुक्यातील लोकांच्या हितासाठी तसदी घेतली पाहिजे,असेही मत तालुक्यातील आम लोकांचे आहे.

         याचबरोबर अवैध व्यवसायाला चालना कोण देतोय,कुणाच्या छत्रछायेखाली मागील ११ वर्षांपासून ते आजातागयत अवैध धंदे सुरु आहेत,अवैध धंद्यांमुळे कोण कोण मालामाल झाले आहेत?,याचे CDR सुध्दा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तपासले पाहिजे या मताची जनता आहे.

         तद्वतच मागील ११ वर्षांपासून कोण कोण अवैधरित्या वाळूचा व मुरुमांचा मोठ्या प्रमाणात उपसा करीत होते व उपसा करीत आहेत याची सखोल चौकशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करायला हवी,या अपेक्षेने चिमूर तालुक्यातील जनता वाट बघते आहे.

CDR…..

       CDR चेक करण्याचे अधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरकारला आहेत.याचबरोबर न्यायाधीशांना आहेत.यामुळे चिमूर तालुक्यातील अधिकाऱ्यांचे व अवैध धंदेवाईकांचे CDR तेच चेक करु शकतात.

रोष म्हणजे काय?

      चिमूर तालुकातंर्गत अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरु असताना अवैध धंदे बंद करण्यासाठी चिमूर पोलिस ठाण्याचे ठाणेदार दिनेश लबडे,संबंधीत महसूल अधिकारी,आणि आमदार किर्तीकुमार भांगडिया हे अवैध धंदेवाईकांवर आवश्यक कारवाई संबंधाने रोष काढतांना कधीच दिसले नाही…

       पण,कुमार प्रथम संजय बाळबुधे या व्यक्तीला पुढे करून त्या व्यक्तीद्वारे खंडणीचा आरोप पाच पत्रकारांवर होताच,या अनुषंगाने पत्रकारांवर ठाणेदारांचा रोष तात्काळ सुरू होतोय,याला काय म्हणावे?

त्या पत्रकार संघटनचे पदाधिकारी कुठे आहेत?….

        चिमूर तालुक्यातील ज्या पाच पत्रकारांवर खंडणीचा आरोप झालाय ते पाचही पत्रकार हे व्हाईस आॅफ मिडिया चिमूर तालुका संघाचे पदाधिकारी आहेत.

         या पाच पत्रकारांवर झालेले खंडणीचे आरोप सत्य आहेत की नाही,हे तपासणे आणि त्यांना दिलासा देणे हे संबंधित पत्रकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे आद्य कर्तव्य आहे.

        याचबरोबर या पत्रकार संघटनेच्या महाराष्ट्र पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बोलून,ते दाखल झालेले खंडणीचे गुन्हे कमी करुन घेणे गरजेचे असल्याचे दिसून येत आहे.

     सदर दाखल झालेले खंडणीचे गुन्हे हे पोलिस महासंचालक,पोलिस आयुक्त हे कमी करु शकतात,असे असल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसे आदेश निर्गमित करणे आवश्यक आहेत.

पदाचा उपयोग योग्य व्हावा…

         पोलिस अधिकाऱ्यांना गुन्हे दाखल करण्याचे अधिकार आहेत.परंतु पुर्ण चौकशी अंती खंडणी सारखे आणि इतर गंभीर गुन्हे त्यांनी दाखल करायला पाहिजे…

       कारण संबंधित व्यक्ती सह कुटुंबातील सदस्यांचे भविष्य उध्दवस्त होणार नाही या अनुषंगाने मानविय दृष्टीकोनातून पोलिस अधिकाऱ्यांनी कर्तव्य पार पाडण्यासाठी पुढे यायला हवे..‌..

        पोलिस अधिकाऱ्यांची जबाबदारी लोक संरक्षणासाठी असल्याने त्यांनी याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही,हीच त्यांची सचोटी आहे…