राकेश चव्हाण
कूरखेडा तालुका प्रतिनिधी
कूरखेडा पंचायत समिती मध्ये कार्यरत, खंडणी वसूली करीता विशेषत:महिला कर्मचारी यांना शारिरीक, मानसिक त्रास देणाऱ्या येथील सहायक गट विकास अधिकारी डी. बी.उराडे यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीचे निवेदन उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले याना तालूका ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचा वतीने देण्यात आले याप्रसंगी तालूक्यातील ४२ ही ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत अधिकारी हजर होते.
कूरखेडा पंचायत समीती कार्यालयात रूजू झाल्यापासूनच साहायक गट विकास अधिकारी उराडे व ग्रामपंचायत अधिकारी संघटनेत वाद सूरू आहे. उराडे यानी रूजू होताच तालूक्यातील बहूसंख्य ग्रामपंचायतीना भेटी देत दफ्तर तपासणीचा नावाने अभिलेखाची सखोल तपासणी न करता मोघम स्वरूपात अहवाल तयार करीत भ्रष्टाचार झाल्याचा नोटीस संबंधित ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना बजावण्याचा सपाटा सूरू केला आहे.
तसेच महिला कर्मचाऱ्यांना विशेष टार्गेट करीत त्यांचा ग्रामपंचायतीत सांयकाळी उशीरा पर्यंत तपासणी,आपल्या केबीन मध्ये दोन दोन तास उभा ठेवत त्याना मानसिक व शारीरिक त्रास देण्याचा कृती तसेच गून्हा दाखल करण्याची धमकी यामूळे कर्मचाऱ्यांची मानसिकता बिघडत आहे. तसेच लगतचा चंन्द्रपूर जिल्हातील त्याचे संबंधित असलेले कथीत पत्रकार,माहीती अधिकार कार्यकर्ते यांचा मार्फत ग्रामपंचायत कार्यालयाची माहीती व तक्रारीचा सपाटा लावल्याने ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना दैनंदिनी कर्तव्याचे कामे करने कठीन झाले आहे.
यापूर्वी सूद्धा सदर अधिकाऱ्यांच्या विरोधात संघटने कडून जिल्हाव्यापी कामबंद व निदर्शने आंदोलन करण्यात आले आहे. आज उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन देत महिला कर्मचाऱ्यांना मानसिक शारीरिक त्रास देणार्या तसेच उराडे यांचा माहीती वरून ग्रामपंचायत कार्यालयावर खंडणी करीता दबाव निर्माण करणारे,तसेच लगतचा जिल्हातील कथीत पत्रकार व माहीती अधिकार कार्यकर्ते यांच्या विरोधात ही चौकशी करीत गून्हा दाखल करण्यात यावा या मागणीचे निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी तालूका ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे अध्यक्ष दिवाकर निंदेकर, सचिव लोमेश्वर किरणापूरे, उपाध्यक्ष गौतम गेडाम, नरेंद्र आबोने, योगेश टिकले, डाकराम ठाकरे, विलास बावणे, पांडूरंग बुराडे, प्रमोद दूफारे,दिगांबर मिसार अंबादास राठोड,योगाजी बंसोड यांचा सह ४२ ग्रामपंचायत अधिकारी हजर होते.आता प्रशाषन उराडे यांचे वर काय कारवाई करणार या कडे स्थानिक पदाधिकारी यांचे लक्ष लागले आहे.



