युवराज डोंगरे /खल्लार
उपसंपादक
जि. प. प्रा. मराठी शाळा आणि अंगणवाडी केंद्र धानोरा (शिक्रा)यांचे संयुक्त विद्यमाने महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये रांगोळी स्पर्धा, लिंबू चमचा आणि संगित खुर्ची या स्पर्धा घेण्यात आल्या. गावामध्ये अशा प्रकारच्या प्रथमच स्पर्धा घेण्यात आल्याने त्यामधे उत्सुकता असल्याने उत्फूर्त सहभाग नोंदविला गेला.
विजयी स्पर्धकांमध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकाविणाऱ्या सर्व खेळातील स्पर्धकांना प्रत्येकी अनुक्रमे साडी, ब्लाऊज पिस आणि बेंगल सेट याप्रमाणे सरपंच लता मालगावे, उपसरपंच मारोती रामटेके आणि ममता राजूरकर पोलिस पाटील यांचे हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले.
या स्पर्धांमध्ये महिला विविध खेळांमध्ये विजयी ठरल्या. संगित खुर्चीमध्ये रोशनी टेम्भरे, सोनाली जुनघरे, दिक्षा जुनघरे यांनी क्रमांक पटकाविला लिंबू चमचा स्पर्धेमध्ये माधुरी पाटील, सोनाली जुनघरे, राणी मालगावे यांनी क्रमांक मिळविला तर रांगोळी स्पर्धेमधे राणी मालगावे, राणी गरड, तर रिया चौधरी यांनी क्रमांक पटकाविला.
महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध खेळ व स्पर्धा चे आयोजन सातत्याने करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन ममता राजूरकर यांनी केले. महिलाकरिता विविध स्पर्धा आयोजन केल्यामुळे ग्रामीण महिलांच्या कलागुणांना वाव मिळाला महिलांच्या विविध स्पर्धांचे आयोजन करून यशस्वी करण्याकरिता दिपक धांडे, सुरज मंडे, शकिला बानो, रेखा तामगागडे, सुरज जुनघरे, वसंत टेम्भरे, अश्विनी मेश्राम, अश्विनी शेंडे, कीर्ति चौधरी, पल्लवी पडोळे, आरवी शेंडे, वैशाली मेश्राम, वेणु भुईभांडे, सिमा मालेगाव, राणी टेंभरे, दुर्गा मारब्दे, प्रिती शिखरे, शितल कांबळे, कांता रंगारी, ज्योत्स्ना बद्रे, भाविका शेंडे, सोनम सिखरे, आरती कातकिडे, चेतना शेंडे, पंचशिला डोंगरे, मनिषा शेंडे, अंजू खंबरे, वर्षा मेश्राम, सपना मालगावे, अल्का टेंभरे, अर्चना मालेगाव, श्रुतिका कांबळे, आरती पडोळे, पीयू मेश्राम, यांचे आणि गावातील इतरांचे महिलांचे मोलाचे सहकार्य लाभले.



