Home Social जेतवन बुद्ध विहार मालेवाडा येथे अखंड भारताचे निर्माते महान प्रियदर्शी चक्रवर्ती राजा...

जेतवन बुद्ध विहार मालेवाडा येथे अखंड भारताचे निर्माते महान प्रियदर्शी चक्रवर्ती राजा सम्राट अशोक यांची जयंती साजरी…

शुभम गजभिये

  विशेष प्रतिनिधी

      चिमूर तालुक्यातील जेतवन बुद्ध विहार,मालेवाडा येथे दि. 26 मार्च 2026 रोजी सकाळी ठीक 9.30 वाजता प्रियदर्शी चक्रवर्ती महान राजा सम्राट अशोक यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला.

       प्रियदर्शी चक्रवर्ती राजा सम्राट अशोक महान यांच्या प्रतिमेला श्रावणी चौधरी,रुचिका चौधरी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करून अभिवादन केले.

       याप्रसंगी प्रदीप मेश्राम यांनी प्रियदर्शी चक्रवर्ती राजा सम्राट अशोक महान यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.

       मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करणारा,औषधी व इतर उपयुक्त वनस्पती,तसेच शिकारीस बंदी घालून,जंगलांचे संवर्धन करणारा,जगातला पहिला पर्यावरणवादी सम्राट.साम्राज्यात मनुष्याबरोबरच जनावरांसाठी ही चिकित्सालय,पाण्याची सोय करून प्राणीमात्रांचा ही प्रजेप्रमाणे सांभाळ करणारे त सम्राट होते.

      84 हजार बौद्ध स्तुपांची निर्मिती करून,बुद्धांचा धम्म जगाच्या पाठीवर नेणारा सम्राट.लेणी,शिलालेख,स्तंभलेख याची भारताला सर्वप्रथम ओळख करून देणारा सम्राट अशोक.

      अशा शब्दात मान्यवरांनी प्रियदर्शी चक्रवर्ती राजा सम्राट अशोक महान यांच्या कार्याचं स्मरण करून त्यांना अभिवादन केलं.

      याप्रसंगी अशोक मेश्राम,गहिनाबाई बांबोडे,सत्यफुलाबाई चव्हाण,गीता मेश्राम,शुभांगी मेश्राम,प्रेमिला गजभिये,छकुंलताबाई मेश्राम आदी मान्यवर व शालेय विद्यार्थी उपस्थित होते.

       कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश मेश्राम यांनी केले तर आभार प्रदीप यांनी मानले.