राकेश चव्हाण
कूरखेडा तालुका प्रतिनिधी
तालूक्यातील गोठणगांव व चांदागड फिडर वर दोन्ही पायाला अपंगत्व असतानाही मागील काही वर्षापासून कर्तव्य दक्ष पणे सेवा बजावणारे सिनियर टेक्निशियन (लाईनमॅन) प्रमोद गूडदे यांचे प्रस्तावित स्थातंरण रद्द करीत त्याना याच ठिकाणी कायम ठेवण्यात यावे अशी मागणी आज दि २५ मार्च रोजी येथील नागरीकानी विद्यूत कंपनीचे कार्यकारी अभियंता गडचिरोली याना उपविभागीय अभियंता मुरकुटे कूरखेडा यांचा मार्फत निवेदन पाठवत केली आहे
प्रमोद गूडदे हे दोन्ही पायानी अपंग आहेत मात्र या अपंगत्वाचा कोणताच बाऊ न करता ते रात्री बेरात्री गोठणगांव,चांदागड, सालईटोला येथील विद्यूत समस्येची माहीती मिळताच ते कोणताच विलंब न करता सहकार्या सह कर्तव्याचा ठिकाणी हजर होतात व दूरूस्ती कार्यवाही पूर्ण करतात सगळ्याशी सौजन्य पूर्ण वागणूकी मूळे ते परीसरात लोकप्रिय आहेत अशा कर्तव्य दक्ष विद्यूत कर्मचार्यांची नियोजित स्थातंरण रद्द करण्यात यावे या मागणी करीता आज गावकर्यानी निवेदन दिले.
याप्रसंगी गोठणगांव तंठा मूक्ती समीतीचे अध्यक्ष वामन पाटनकर, शाळा व्यवस्थापन समीती अध्यक्ष देवेंद्र भोयर, वन हक्क समीती अध्यक्ष राजकूमार दूगा, माजी ग्राम पंचायत सदस्य हिराजी माकडे, मयुर दोनाडकर,अतूल मेश्राम,संदिप कांबळी,विवेक दूगा,भागेश्वर सहारे,दिलेश दोनाडकर,नागेश सिंगाडे, देवदास दुगा तसेच गोठणगांव चांदागड व सालईटोला येथील नागरिक हजर होते.



