Home क्रीडा महाराष्ट्रातील कुस्ती शौकीनांसाठी राज्याच्या वतीने जेवढी मोठी मदत करता येईल तेवढी केल्याशिवाय...

महाराष्ट्रातील कुस्ती शौकीनांसाठी राज्याच्या वतीने जेवढी मोठी मदत करता येईल तेवढी केल्याशिवाय मी राहणार नाही :- कृषिमंत्री दत्तात्रय भरणे… — कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते महाराष्ट्र केसरी पैं. हर्षवर्धन सदगीरला चांदीची गदा देऊन करण्यात आले सन्मानित… — ६८ वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये पैंलवान हर्षवर्धन सदगीर हा महाराष्ट्र केसरी किताबाचा ठरला मानकरी…

  बाळासाहेब सुतार

निरा नरसिंहपूर प्रतिनिधी

        वाघोली येथे २२ मार्च रोजी आयोजित ६८ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम सामन्यास राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आपली उपस्थिती लावून. 

      अंतिम लढतीची एक नंबर शेवटची कुस्ती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते लावण्यात आली.

         या प्रसंगी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, महाराष्ट्रातील कुस्ती शौकीन पैलवानांना जेवढी मोठी मदत करता येईल तेवढी महाराष्ट्र शासनाकडून माझ्या वतीने करण्यात येईल. क्रीडामंत्री सुनेत्रा वहिनी पवार असल्यामुळे कोणतीही अडचण येणार नाही. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे वाघोली येथे उद्गार. 

          पै.हर्षवर्धन सदगीर आणि पै.महेंद्र गायकवाड यांच्यातील अंतिम लढतीचा सामना अतिशय रोमहर्षक आणि थरारक झाला. दोन्ही मल्लांनी अप्रतिम जिद्द, ताकद आणि कौशल्य दाखवीत प्रेक्षकांची मने जिंकली.

         या लढतीत पै. हर्षवर्धन सदगीर यांनी आपल्या दमदार खेळाच्या जोरावर महाराष्ट्र केसरी किताबावर आपले नाव कोरले, तर उपविजेता पै. महेंद्र गायकवाड यांनीही तितक्याच प्रभावी कामगिरीतून कुस्ती प्रेमींची मने जिंकली. या अंतिम सामन्याने उपस्थित प्रेक्षकांना श्वास रोखून धरणारा थरारक अनुभवायला मिळाला.