Home Maharashtra गॅस सिलेंडर दरवाढ व काळाबाजार विरोधात बसपाने केली निदर्शने..

गॅस सिलेंडर दरवाढ व काळाबाजार विरोधात बसपाने केली निदर्शने..

राजेंद्र रामटेके 

विशेष प्रतिनिधी 

        राज्य व केंद्र सरकारच्या महागाई व जनविरोधी नीतीच्या विरोधात जसे गॅस सिलेंडर दरवाढ, कृत्रिम टंचाई व त्याच्या काळाबाजार विरोधात बहुजन समाज पार्टीने आज नागपूरच्या संविधान चौकात सरकारच्या विरोधात तीव्र निदर्शने करून प्रधानमंत्री, मुख्यमंत्री, अन्नपुरवठा मंत्री यांना उपजिल्हाधिकारी सचिन गोसावी यांच्या माध्यमातून शिष्टमंडळाद्वारे निवेदन देण्यात आले. आठ दिवसात गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत करा अन्यथा बसपा रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशाराही देण्यात आला.

            गॅस दरवाढ रद्द करा, सिलेंडरची कृत्रिम टंचाई बंद करा, त्याचा काळाबाजार करणाऱ्यावर कार्यवाही करा, सिलेंडर पुरवठा नियमित करा, अन्यथा खुर्ची खाली करा आदि घोषणा देत महाराष्ट्र प्रदेश सचिव भगवान भोंडे, उत्तम शेवडे, प्रफुल मानके, विवेक हाडके, जिल्हाध्यक्ष योगीराज लांजेवार, शहराध्यक्ष अनिकेत कुत्तरमारे, महिला नेत्या रंजनाताई ढोरे, शबाना खान, ताराबाई गौरखेडे, कविता लांडगे, राजकुमार बोरकर, जितेंद्र घोडेस्वार, संजय जयस्वाल, गौतम पाटील, मंगेश नागदेवे, सौरभ जामगडे, महेश माने, अभिलेश वाहने, मोहम्मद फिरोज, राजू चांदेकर, रमा नागसेन गजभिये, कविता लांडगे यांच्या नेतृत्वात भव्य नारे निदर्शने करून येत्या आठ दिवसात गॅस सिलेंडरचा पुरवठा नियमित करा अन्यथा बसपा रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असाही इशारा या प्रसंगी देण्यात आला.

            याप्रसंगी साक्षी सोमकुवर, माधुरी मेश्राम, चंदा झोडापे, नीलिमा मेश्राम, अंकित थूल, स्वप्निल ढवळे, विलास सोमकुवर, सुरेंद्र डोंगरे, जितेंद्र पाटील, राकेश गजभिये, प्रतीक हजारे, सहदेव पिल्लेवान, मुकुल सूर्यवंशी, नितीन वंजारी, नरेंद्र शेंडे, अतुल मेश्राम, दिनेश गुप्ता, अरविंद तायडे, अरविंद मेश्राम, धनराज रामटेके, राकेश सहारे, मंगल चौरसिया, मोहम्मद फिरोज, रवींद्र तागडे, नरेंद्र सोमकुवर, पुंडलिक गुडधे, चिंटू पठाण, राजाभाऊ गोंडे, दिलीप रामटेके, धम्मदीप दहिवले, गोवर्धन मोहिते, अमित बनसोड, सुभाष गजभिये, अक्षय खोब्रागडे, मनोज निकाळजे, सुमित जांभुळकर, सुधाकर सोनपिपळे, प्रवीण पाटील, नरेंद्र थूल, पंकज नाखले, रामकुमार गोणेकर आदि प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्या सहित मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.