Home शैक्षणिक श्रीराम विद्यालय कुरखेडा येथील विद्यार्थिनी कुमारी, रिया धनंजय कुवर नवोदय विद्यालयासाठी पात्र…

श्रीराम विद्यालय कुरखेडा येथील विद्यार्थिनी कुमारी, रिया धनंजय कुवर नवोदय विद्यालयासाठी पात्र…

    राकेश चव्हाण

कुरखेडा तालुका प्रतिनिधी 

       आदिवासी ग्रामीण विकास शिक्षण संस्था कुरखेडा द्वारा संचालित श्रीराम विद्यालय कुरखेडा येथील विद्यार्थिनीं कुमारी रिया धनंजय कुवर हिने नुकताच जाहीर झालेल्या नवोदय प्रवेश परीक्षेत पास होऊन जवाहर नवोदय विद्यालयात आपला प्रवेश निश्चित करून शाळेचे तथा गुरुजन व पालक यांचे नावलौकिक केला आहे. 

        रिया धनंजय कुवर मुलींच्या घवघवीत यशामागे वर्षभराचे नियोजन, शिक्षकांचे मार्गदर्शन, ५ व्या वर्गाच्या सुरुवातीपासूनच नवोदय परीक्षेची तयारी. नियमित शाळेव्यतिरिक्त ज्यादा वर्गांचे आयोजन. प्रत्येक आठवड्यात घटक चाचणी आणि महिन्याला सराव परीक्षा. शैक्षणिक व्हिडिओंच्या माध्यमातून कठीण संकल्पनांचे स्पष्टीकरण. प्राचार्य नागेश्वर फाये यांनी राबविलेल्या नवोदय सराव चाचणी उपक्रमाचा या विद्यार्थिनींना फार मोठा फायदा झाला आहे.

       शिक्षकांचे मार्गदर्शन, वेळेवर घेतलेल्या सराव परीक्षा आणि पालकांचा पाठिंबा यामुळेच आम्ही हे यश संपादन करू शकलो असे मत यशस्वी विद्यार्थिनीनी व्यक्त केले आहे.

        यावेळी संस्था कोषाध्यक्ष तथा शाळा समिती अध्यक्ष वामनराव फाये, संस्था सहसचिव व प्राचार्य नागेश्वर फाये, शिक्षक संजय शिरपूरवार, वासुदेव मस्के, धनंजय नाकतोडे , विलास मेश्राम, आर . एम.पधरे, व्हि.व्ही फाये, शिक्षिका लता राऊत,प्रा.प्रदीप पाटणकर प्रा. विनोद नागपूरकर शिक्षकेतर कर्मचारी भास्कर बारसागडे व किशोर बनसोड यांनी यशस्वी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले आहे.