Home देशविदेश कल्पनेचे वास्तव आणि वास्तवाची कल्पना…

कल्पनेचे वास्तव आणि वास्तवाची कल्पना…

     काल्पनिक गोष्टी याचा अर्थ जे डोळ्याला दिसत नाहीत,जाणवत नाहीत उदा.देव,स्वर्ग,पुनर्जन्म,दैव,धर्म,जात,या गोष्टी दृश्यमान जरी नसल्या तरी यास मान्यता असल्यामुळे आणि त्याची अंमलबजावणी होत असल्यामुळे या काल्पनिक गोष्टींचे अस्तित्व सिद्ध होते,अर्थात मान्यतेच्या पातळीवर.समाजात या काल्पनिक गोष्टी कार्यरत आहेत.म्हणून यास ‘ कल्पनेचे वास्तव ‘ म्हणावे लागते.या काल्पनिक गोष्टी म्हणजे निराधार , बिन पुराव्याच्या,सत्याच्या कसोटीवर न टिकणाऱ्या,तर्कहीन गोष्टी,संकल्पना,विचार,भावना.परंतु जे नाही त्याला आहे,असे मानायचे आणि त्यानुसार व्यवहार करायचा म्हणजेच ,याचा अर्थ ‘ कल्पनेचे वास्तव ‘ असे म्हणावे लागते.

   या उलट जे काल्पनिक नाही,तरी ते डोळ्याला दिसत नाही, पंचंद्रियाद्वारे जाणीव होत नाही,तरी अशी गोष्ट काल्पनिक नव्हे ,पण वास्तविक आहे,ती म्हणजे वर्ग.समाजातील आर्थिक वर्ग.गरीब ,मध्यम , श्रीमंत जे अस्तित्वात आहेत,याचे परिणाम जाणवतात,भोगावे लागतात,म्हणजेच हे वास्तव चित्र आहे.तरी या चित्रास स्पर्श करता येत नाही.डोळ्याला दिसत नाही,यास आकार मान ,वजन नाही,म्हणून हे काल्पनिक ठरते,परंतु ‘ वर्ग ‘ ही संकल्पना काल्पनिक होऊ शकत नाही,कारण ती वास्तविक आहे,व्यवहारात उतरू शकते,म्हणजे व्यवहारिक आहे,जे विचार,भावना,कल्पना व्यवहारिक पातळीवर सिद्ध होतात,टिकतात,त्यानुसार व्यवहार होत असतो,अशी संकल्पना म्हणजेच वास्तव होय.म्हणून ‘ वर्ग ‘ ही संकल्पना वास्तवाची कल्पना ठरते.

    कल्पनेतील वास्तव सत्याच्या कसोटीवर टिकू शकत नाही,त्यातील खोटेपणा जेंव्हा सिद्ध होईल तेंव्हा वास्तवातील काल्पनिक गोष्टी नष्ट होतात,आणि वास्तवातील कल्पना जेंव्हा सिद्ध होतील तेंव्हा तेंव्हा त्या टिकून राहतात.म्हणून वर्ग ही वास्तवातील कल्पना नसून ती टिकलेली आहे.

     पण गंमत अशी की,वर्ग असो,जात असो,की धर्म असो,की देव दैव असो या काल्पनिक गोष्टींचे अस्तित्व हे विषमतावादी व्यवस्थेतच असते,वर्तमान परिस्थितीत आहे.परंतु वर्तमान परिस्थिती जेव्हा बदलेल,म्हणजे विषमतावादी व्यवस्था बदलून समतावादी व्यवस्था निर्माण होईल ( हे शक्य आहे ) तेंव्हा मात्र वर्ग जात धर्म देव दैव पुनर्जन्म या गोष्टी आपोआप विरून जातील,यांचे अस्तित्वच नष्ट होईल,याचे कारण समतेच्या वर्तमान परिस्थितीत,वातावरणात या गोष्टींची माणसाला गरजच पडणार नाही.

      लेखक : दत्ता तुमवाड

        सत्यशोधक समाज नांदेड

             फोन : 9420912209.