Home Social उमेद महिला स्वयंसहायता समुहाच्या शेवया व पापड उद्योग केंद्राचे उद्घाटन… —...

उमेद महिला स्वयंसहायता समुहाच्या शेवया व पापड उद्योग केंद्राचे उद्घाटन… — महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचा उपक्रम…

ऋषी सहारे 

   संपादक 

आरमोरी – जोगीसाखरा येथील जय भवानी महिला स्वयंसहायता समुह, प्रज्ञा महिला ग्रामसंघ व जय भवानी महिला गट यांच्या शेवया व पापड उद्योग विक्री केंद्राचे नुकताच उद्घाटन समारंभ सोहळा संपन्न झाला.

            महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष,आरमोरी जिल्हा गडचिरोली अंतर्गत जय भवानी महिला स्वयंसहायता समुह, प्रज्ञा महिला ग्रामसंघ व जय भवानी महिला गट ,यांचे मशीन व्दारे शेवया व पापड उद्योग विक्री केंद्राचे उद्घाटन समारंभ सोहळा नुकताच संपन्न झाला.

           यावेळी आय.बी.सि.बी. अर्चना मोडक मॅडम, मंगेश बोदेले, प्रभाग समन्वयक मुकेश कोल्हे, माजी पंचायत समिती सदस्य वृंदाताई गजभिये, प्रज्ञा ग्राम संघाच्या अध्यक्ष अनिताताई मडावी, सचिव उषाताई गेडाम,आय .सि.आर. पी. विशाखाताई सहारे, अध्यक्षा सरीताताई सयाम,सहाय्यक चित्रलेखाताई बडवाईक, ग्राम सखी खेमलताताई हजारे, पशुसखी शर्मिला धोंगडे, बँक सखी रीना घुटके,हंसागर सोरते, आणि उमेद समुहातील संपूर्ण महिला प्रामुख्याने उपस्थित होते.

       हा महाराष्ट्र शासनाचा महत्वाचा उपक्रम असून याचा उद्देश ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणे आहे. या अंतर्गत महिला स्वयंसहायता समुह तयार करून त्यांना उद्योग उभारण्यासाठी पुढाकार घेऊन मदत केली जाते. शेवया व पापड मशीन व्दारे उद्योग हा महिलांसाठी अतिशय चांगला,कमी भांडवलात सुरू होणारा आणि घरबसल्या चालणारा व्यवसाय आहे. शेवया आणि पापड हे रोजच्या वापरातील खाद्यपदार्थ असुन मशीनच्या मदतीने मोठ्या प्रमाणात उत्पादन करून स्थानिक बाजारात, किराणा दुकानात किंवा ऑनलाईन विक्री करता येतो.

        आजच्या दैनंदिन जीवनात शेवया व पापड ला अतिशय मागणी आहे.त्यामुळे सदरील उद्योग हा भरभराटीस येवून उमेद स्वयंसहायता गटातील महिला अधिक सक्षम बनल्याशिवाय राहणार नाहीत. असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला.