हिंदू मुस्लिम ख्रिश्चन आणि काही अन्य धार्मिक ग्रंथांचा बारकाईने अभ्यास केल्यास असे दिसून येते की,त्यात बऱ्याच गोष्टी या तर्कसंगत नसतात.पुराव्यासहित नसतात,म्हणून त्या चुकीच्या आणि खोट्या असतात.काल्पनिक वाटतात.ते पुढील प्रमाणे
1.सर्वव्यापी जगत नियंत्रक ईश्वर
प्रत्येकात आत्मा आहे,आत्मा म्हणजेच परमेश्वर.असे असेल तर आणि तो नियंत्रक असेल तर,माणसांना शारीरिक रोग का होतात? झाले तर तो नष्ट का करीत नाही ? त्यासाठी डॉक्टरची का आवश्यकता पडावी ? तो जर खरोखरच नियंत्रक असेल तर,रोगांचे नियंत्रण करायला हवे.पण तसे होताना दिसत नाही.
दुसरे उदाहरण असे की,गरीब मध्यम श्रीमंत असे आर्थिकभेद का झाले ? देवाने ही विषमता का निर्माण होऊ दिली ? देवाला सर्व लेकरे सारखीच ना ?
तसेच जातीभेद,शिवाशिव,रोटीबंदी,बेटीबंदी,असा नियम कायदा मनूने केला , त्यावेळी त्यांचे देवाने नियंत्रण का केले नाही.याचा अर्थ देवाचा विषमतावादी मनूला पाठिंबा होता ,असे म्हणायचे का ,? ते शक्य नाही.कारण सर्व देवाची लेकरे असतील तर,त्यांच्यात भेद कसला ? असूच शकत नाही.मग विषमतावादी दुष्ट प्रवृत्तीच्या माणसाने भांडणे लावण्यासाठी हा जर जातीभेद ,आणि उच्चनीचता,स्पृश्य अस्पृश्यता निर्माण केली असेल तर देवाने त्यास रोखले का नाही? कारण देव म्हणजे एक नियंत्रण शक्ती आहे ना ,? त्याच्या पुढे माणूस म्हणजे पालापाचोळा आहे.
थोडक्यात शूद्र माणसाने स्वतःच्या स्वार्थासाठी वर्चस्वासाठी शोषणासाठी ही आर्थिक सामाजिक विषमता या सर्वशक्तिमान जगत नियंत्याने या अनिष्ट प्रथेला,व्यवस्थेला बंधन का केले नाही ? या प्रश्नाचे उत्तर दोन असू शकतात.1त्याच्यात माणसापेक्षा जास्त ताकद नाही.2 किंवा त्याचे अस्तित्वच नाही.’ देव ‘ ही केवळ मानवनिर्मित काल्पनिक संकल्पना असावी.
2.धर्मग्रंथात ईश्वराचे अस्तित्व आणि महत्त्व जसे सांगितले आहे,तसेच सैतान,राक्षस, भूत, हडळ, डेव्हिल्स यांचे वर्णन पण आहे.
माणसाच्या जीवनात जे जे वाईट घडते,किंवा संकटे येतात,त्याचे कारण म्हणजे सैतान, डेव्हिल्स, भूतबाधा,राक्षस यांचा माणसाच्या जीवनातील अडथळा होय.
अर्थात हे कसे खरे समजायचे ? हा खरा प्रश्न आहे.माणूस आजारी पडतो,जीवनात अनेक संकटे येतात,त्यास वाईट गोष्टींचा नाद लागतो,याचे कारण या दुष्टशक्ती कारणीभूत असतात,असे साऱ्याच धर्मग्रंथाचे सांगणे आहे.आणि आश्चर्याची गोष्ट ही की,ज्यावेळी विज्ञानाचे शोध लागले नव्हते, त्या शतकात असा विचार करणे शक्य होऊ शकते, परंतु ह्या विसाव्या 21व्या शतकामध्ये विज्ञानाचे शोध लागलेले असताना सुद्धा अशा संकल्पना वर सुशिक्षित लोक सुद्धा विश्वास ठेवतात तेव्हा त्यांची कीव येते.
शिवाय अशी दुष्ट कृत्य करणाऱ्या या दुष्ट शक्तींना ईश्वर का रोखू शकत नाही ? असा पण प्रश्न निर्माण होतो. खरे तर सैतान सेक्सी सैतान शक्ती पेक्षाही ईश्वर शक्ती ही ताकतवान आहे. ईश्वराकडे याचा उपाय नाही म्हणून लोक डॉक्टर कडे जातात.
3.दैव आणि नशीब,आणि भविष्य:
या गोष्टींना पण धर्मग्रंथात मान्यता आहे, असे असेल तर मग देवाच्या हाती या गोष्टी का नाहीत? तसा अजून एक प्रश्न निर्माण होतो.
आपण कोण्या जातीत कुण्या धर्मात किंवा कुण्या वर्गात जन्माला यायचे ते दैवत किंवा नशिबात जसे लिहिले आहे त्यानुसार घडत असते, असा एक सिद्धांत मांडला जातो जो धर्मग्रंथांनी मान्य केला आहे, आणि हे पूर्वीच्या जन्मामध्ये केलेले पाप आणि पुण्यावरून घडत असते, असे असेल तर मग इथे देवाचे काय काम ? असा अजून एक प्रश्न निर्माण होतो.
4. पुनर्जन्म आणि मोक्ष:
माणसाने केलेले पाप कर्म आणि पुण्य कर्म यानुसार स्वर्गात की मृत्यू लोकात की पाताळात जन्म मिळावा हे ठरत असते, असे पण धर्मग्रंथात सांगितल्या गेले आहे. जे चुकीचे आहे, कारण याला काही पुरावे किंवा आधार नाही. स्वर्ग कुठे आहे? आकाशात का ? पाताळ म्हणजे काय ,? तिथे राक्षस किंवा सैतान राहतात, याला पुरावा काय ? याबद्दल चे वर्णन धर्मग्रंथात सापडत नाही. याचा अर्थ तर्क आणि पुराव्या विना लिहिल्या गेलेले हे ग्रंथ बुद्धिवादी लोकांनी कसे मानायचे? यावर कसा विश्वास ठेवायचा? हाच तर खरा प्रश्न आहे. विज्ञान युगात या काल्पनिक गोष्टीवर विश्वास ठेवणे म्हणजे आपल्या बुद्धीचे दिवाळे काढणेच होय.
सारांश,देव,सैतान,दैव,भविष्य,स्वर्ग,मोक्ष ,पुनर्जन्म, या साऱ्या निराधार ,निरुपयोगी,भाकडकथा सर्वच धर्मग्रंथात वाचायला मिळतात.आपण त्या मोठ्या चवीने,भक्तिभावाने,श्रद्धेने,लक्षपूर्वक ऐकतो,आत्मसात करतो,त्या अमलात पण आणतो,परंतु आपण प्राणी पक्षी नसून एक माणूस आहोत,आपल्या ‘ बुद्धी ‘ ही एक शक्ती आहे,तिचा वापर करीत नाही.” बाबा सद्गुरू वाक्यम् प्रमाणं म्हणून अडंधळेपणे मान्यता देतो.तशी कृती करतो.यामुळेच आपले आर्थिक नुकसान होत आहे,बंधुभाव नष्ट होत आहे.समता वृत्ती लोप पावत आहे.एकंदरीत खोट्या,चुकीच्या धर्मग्रंथाने आपले पिढ्यानपिढीपासून नुकसानच होत आहे.हे कळले पाहिजे.


