शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
उन्हाळ्यातील मोसमात जंगलात वणवा (Forest Fire) लावणे पर्यावरणासाठी धोकादायक असून हा एक दखलपात्र गुन्हा असल्याचे मत वनविभागाचे आहे.
बारामतीसह अनेक भागांत वन विभागाने,नवीन गवत उगवण्यासाठी किंवा अन्य कारणांसाठी वनवा लावणाऱ्यांवर कायदेशीर गुन्हा दाखल करून दोन वर्षांची शिक्षा व दंडाची कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.कारण वणव्यामुळे जैवविविधता नष्ट होत आहे.
महाराष्ट्र राज्य वन विभागाने वनांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी कडक भूमिका घेतली असून जंगल भागात वनवा लावणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
तद्वतच वणवा लावणाऱ्या व्यक्तींना जेलमध्ये टाकण्याची कारवाई केली जात असतानाच,वन कर्मचारी वणव्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी २४ तास पहारा देत आहेत.
शेतकरी….
जंगलालगतच्या शेतात वणवा लावण्यापूर्वी वनविभागास पूर्वसूचना देणे आवश्यक आहे,”अन्यथा कारवाई होईल,अशा प्रकारे शेतकऱ्यांना अवगत करून देण्यासंबंधाची कायदेशीर माहिती आहे.यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क होणे आवश्यक आहे….
जंगलाचे संरक्षण करण्यासाठी आग लावणे टाळावे आणि वन्यजीवांच्या सुरक्षेसाठी सहकार्य करावे,असे आवाहन महाराष्ट्र राज्यातील वनपरिक्षेत्राधिकारी करत आहेत.वनवा लावणं धोकादायक असल्याने हे टाळा आणि वनविभागाच्या सूचनांचे पालन करा असेही सुचित केले आहे.



