Home Social जांभुळघाट आरोग्य केंद्राच्या इमारतीत वारंवार घुसतात साप…

जांभुळघाट आरोग्य केंद्राच्या इमारतीत वारंवार घुसतात साप…

    उपक्षम रामटेके

मुख्य कार्यकारी संपादक….

         जांभुळघाट आरोग्य केंद्राच्या इमारतीत आज वेल्या नामक साप असल्याचे आढळून आले असल्याने काही काळ रुग्णात व कर्मचारी स्टाॅफ मध्ये तारांबळ उडाल असल्यानचे दिसून आले.हा साप शस्त्रक्रिया रुममध्ये होताय.

     मागे टवऱ्या प्रजातींचा साप रुग्ण भरती राहातं असलेल्या रुममध्ये आढळून आला होता.

              चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुक्यातील मौजा जांभुळघाट आरोग्य केंद्राच्या इमारतीत वारंवार निघणारे साप रुग्ण आणि डॉक्टर-कर्मचारी यांना त्रासदायक असल्याने,ते साप आरोग्य केंद्राच्या इमारतीत घूसू नये यासाठी बंदोबस्त करणे आवश्यक असल्याचे मत रुग्णांचे आहे.

      आरोग्य केंद्राच्या इमारती सभोवताल असलेले तन,सापांना वास्तव करण्यासाठी सुरक्षित ठिकाण असल्याने ते तिथे राहत असल्याचे दिसून येते.

       याचबरोबर जांभुळघाट आरोग्य केंद्रांच्या इमारतीच्या खिडक्या,दार हे बरोबर नसल्याने तेथूनच साप अंदर येत असल्याचे दिसून येत आहे.

      मात्र रुग्णांच्या व आरोग्य केंद्रात कर्तव्यात असलेल्या स्टाॅफच्या सुरक्षिततेसाठी आरोग्य केंद्राच्या इमारतीत वारंवार साप घूसू नये यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे.