Home Maharashtra देसाईगंज तालुक्यात रानटी हत्तींचा हैदोस, शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान….

देसाईगंज तालुक्यात रानटी हत्तींचा हैदोस, शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान….

    राकेश चव्हाण

तालुका प्रतिनिधी कुरखेडा 

        तालुका देसाईगंज (वडसा ) येथील कसारी / डोंगरमेंढा परिसरात रानटी हत्तीने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे. हत्तीने मका व धान पिकाची नासधूस केली असून शेतातील मोटार पंप, सोलर प्लेट व इतर शेतीसंबंधित साहित्याचीही तोडफोड केली आहे.

              घटनेची माहिती मिळताच स्थानिक आमदार रामदासजी मसराम यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची शेतीची पाहणी केली. त्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण करित तत्काळ पंचनामा करण्याचे निर्देश दिले. तसेच शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसानभरपाई देण्याबाबतही त्यांनी निर्देश दिले. यावेळी वनविभागाचे अधिकारीही घटनास्थळी उपस्थित होते.

             या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शासनाने तातडीने उपाययोजना करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी आमदार मसराम यानी केली आहे.या संदर्भात वनमंत्री यांची भेट घेत परिस्थिती निदर्शनास आणून देत शासन कडून नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असे आश्वासन त्यांनी दिले.

          या प्रसंगी काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष राजेंद्र बुल्ले, विलास बन्सोड, कमलेश बारस्कर, रवी मडावी, निलेश कन्नाके, राजकुमार मस्के, वैभव मस्के, सरपंच प्रदीप मडावी, भाग्यवान कुंभारे, मिलिंद उईके, प्रकाश उईके तसेच वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते.