याच बुद्धीजीवी वर्गाने आपल्या सदसदविवेक बुद्धीने सतत जागृत राहून, जर नैतिक जबाबदारीने सार्वजनिक जीवन महापुरुषाच्या आदर्शाच्या पावलावर पाऊल ठेऊन गेल्या 80 वर्षात जीवन समर्पित केले असते, तर हे जागतिक संकट आलेच नसते.
कारण दुसऱ्या महायुद्धानंतर जगातील बहुतांश देशांनी लोकशाहीला स्वीकारले होते. आणि लोकशाहीचा कणा म्हणजे हाच बुद्धीजीवी वर्ग असतो. त्यातल्या त्यात विशेष म्हणजे लोकशाहीत पत्रकार आणि साहित्यिक हा जास्त जबाबदार असतो.
जसे एखादा मेंढपाळ आपल्या मेंढ्यांना घेऊन दररोज रानात चारायला घेऊन जातो. लांडग्यापासून सर्वांचे रक्षण करून सुखरूप घरी घेऊन येतो. त्याच्या हातातील काठीच समोरच्या म्होरक्या मेंढराची दिशा बदलते. त्या म्होरक्या मेंढराच्या मागे गुमान मागची मेंढरं चालत असतात. म्हणजे मेंढराच्या हातातील काठीच त्या कळपाची दिशादर्शक असते.
अगदी याप्रमाणेच लोकशाहीत ही व्यवस्था असते की, हा बुद्धीजीवी वर्ग आणि त्यातल्या त्यात विशेष करून हा साहित्यिक आणि पत्रकार हा मेंढपाळ असतो. याच्या हातातील काठी म्हणजे सत्ताधारी नेते ( विविध राजकीय पक्ष) असतात. या काठीचा दिग्दर्शक हा बुद्धीजीवी वर्ग असतो. या वर्गाने ही काठी उगारली की म्होरके मेंढरू म्हणजे सर्वसामान्य जनतेतील समजदार वर्ग जो बुद्धीजीवी वर्गाच्या ईशाऱ्याने मार्गक्रमण करणारा असतो. आणि सर्वांगीण विकासाचा एक एक टप्पा पार करत करत लोकशाही प्रगल्भ आणि अविष्कारीत करत करतच स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता ही मूल्ये स्थापित करण्याचे काम हा वर्ग करत असतो. साधारणपणे ही लोकशाही शासन प्रणालीची ढोबळमानाने व्याख्या करता येईल.
परंतू , गेल्या 75 वर्षात या आजच्या केवळ नावावर असणाऱ्या जागतिक लोकशाहीमधील (जी आजरोजी ICU मध्ये गेलेली आहे ) मेंढपाळाची जागा सत्ताधारी राजकीय पक्षांनी कधी घेतली…….!
बुद्धीजीवी वर्गाची काठी बनून या सत्ताधारी पक्षांच्या ( राजकीय ) हातात बाहुले होऊन कधी आली हे समजलेच नाही…….!
परिणामी माकडाच्या हातात कोलीत दिल्यावर तो घराला आगीच लावेल ना…….
अशीच परिस्थिती आज रोजी जागतिक अणूयुद्धात रूपांतरित होते की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. याला जबाबदार नैतिकदृष्ट्या हाच वर्ग आहे.
कारण जागतिक तत्ववेत्ते आणि मानवतावादी महापुरुष आणि सर्वसामान्य निरागस जनता यातील दुवा/माध्यम म्हणजे हाच बुद्धीजीवी वर्ग असतो. ज्याला ही सर्व व्यवस्था समजलेली असते. जनतेत जागृती करून तीला म्होरक्या मेंढराच्या मागे नेऊन लांडग्यापासून सुरक्षित गोठ्यात आणण्याचे काम या वर्गाचे होते.
परंतू , या वर्गाने आपल्या नैतिक कर्तव्याला तिलांजली दिल्यामुळेच आज हे जागतिक संकट ओढवलेले आहे…….!
म्हणूनच………..
जर, इस्राएल /अमेरिका V/S इराण युद्धाचे परिणाम, जर तिसऱ्या जागतिक अंतिम अणूयुद्धात झालेच……….
तर, याला सर्वसामान्य जनता जबाबदार नसून केवळ आणि केवळ जागतिक बुद्धीजीवी वर्गच असेल……!
यावर उपाय काय……?
आता यावर उपाय एकच, तो म्हणजे जर कदाचित येणकेन प्रकारे हे तिसरे जागतिक अणूयुद्ध झालेच नाही आणि आपण सर्वजण सुखरूप राहिलोच, तर मग या बुद्धीजीवी वर्गाची सर्वच जबाबदारी सर्वसामान्य जनतेतील थोड्याफार समजदार असणाऱ्या जनतेलाच स्वीकारावी लागेल. या बुद्धीजीवी वर्गांवर विसंबून न राहता………
अत्त दीप भव :- भगवान बुद्ध
म्हणजे तुझा तू दीप हो याच तत्वज्ञानानुसार सर्वसामान्य जनतेला जीवन समर्पित करावे लागेल. याशिवाय अन्य पर्याय नाही……………


