शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
आज दिनांक १३/०३/२०२६ ला सावित्री लोकसंचालित साधन केंद्र,वरोरा अंतर्गत नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प अंतर्गत MMM व पोलीस प्रशासन बैठक कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत सभागृह शेगांव बु. येथे करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमाला शेगांव बु.पोलीस स्टेशन चे हेड कॉन्स्टेबल श्री.प्रवीण गिट्टे व महिला हेड कॉन्स्टेबल श्रीमती माधुरी नक्षीने,महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाचे संरक्षण अधिकारी श्रीमंत ज्योती चौधरी,तसेच once stop सखी सेंटर सर्व टीम,सावित्री cmrc अध्यक्ष व सचिव तसेच गांव प्रतिनिधी,८ गावतील माविम मित्र मंडळ आणि प्रेरक उपस्थित होते.
माहिती देताना सावित्री लोकसंचालीत साधन केंद्र वरोरा अंतर्गत नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प हा महिलांची सुरक्षा,त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न सोडविण्यासाठी आणि घरगुती व सार्वजनिक हिंसाचार थांबवण्याचे केंद्र असल्याचे मनोगत विविध उदाहरणे देत मान्यवरांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.अमित एस.बानकर व्यवस्थापक व संचालन श्रीमती रंजुताई दुर्गे आभार श्रीमती वैशाली रामटेके यांनी केले.



