Home Social कुरखेडा येथे ‘बिरसा मुंडा चौकाचे लोकार्पण व विर बाबुराव शेडमाके जयंती कार्यक्रम...

कुरखेडा येथे ‘बिरसा मुंडा चौकाचे लोकार्पण व विर बाबुराव शेडमाके जयंती कार्यक्रम संपन्न…

     राकेश चव्हाण

कुरखेडा तालुका प्रतिनिधी 

         वीर शहीद बाबुराव शेडमाके यांच्या १९३ व्या जयंतीनिमित्त कुरखेडा शहरात नवीन बसस्टॉप समोरील कूरखेडा – वडसा मार्गावर ‘बिरसा मुंडा” चौकाचे लोकार्पण व नामफलक अनावरण सोहळा मोठ्या उत्साहात आज दि १२ मार्च रोजी पार पडला. आदिवासी समाजाच्या एकता, स्वाभिमान आणि इतिहासाच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला समाजातील अनेक मान्यवर व बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

      कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोविंदजी टेकाम होते. सप्तरंगी गोंडवाना ध्वजाचे ध्वजारोहण आल इंडिया आदिवासी एम्पलाइज फेडरेशनचे तालुका अध्यक्ष संजय कोकोडे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी विशेष अतिथी म्हणून प्रा. अनिल होळी, इंजिनियर भैसारे, बिरसा ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष गणेशजी वरखडे, सोयाम सर, भूमक नैताम सर, संजूदादा कुंमरे, प्रणय मडावी, कैलास भाऊ उसेंडी, तुलावी पेंटर, नागेश तोपा, गजेंद्र काटेंगे, अहिरकर सर, कपिल कुमारे, नरोटे सर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

         कार्यक्रमाची सुरुवात भगवान बिरसा मुंडा यांच्या नामफलक अनावरणाने झाली. त्यानंतर गोंडवाना ध्वजाचे ध्वजारोहण करून आदिवासी समाजाच्या परंपरा, संस्कृती व स्वाभिमान यांचे स्मरण करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून आदिवासी समाजाच्या इतिहास, संघर्ष आणि एकतेचे महत्त्व अधोरेखित केले.

          ‘जल, जंगल, जमीन आणि स्वाभिमान’ या तत्वांवर आधारित आदिवासी समाजाच्या संघर्षाची परंपरा पुढे नेण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. ‘बिरसा मुंडा चौक’ हा आदिवासी समाजाच्या एकतेचे आणि प्रेरणेचे प्रतीक ठरेल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला. कार्यक्रम ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन,गोटूल सेना तथा बिरसा ब्रिगेड गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.यशस्वीतेकरीता सर्व समाजबांधवानी सहकार्य केले.