Home देशविदेश जिल्ह्यातील हाॅटेल व्यावसायिकांची चलाखी..?  — “उल्लू” बनाया समोसा खिलाया…

जिल्ह्यातील हाॅटेल व्यावसायिकांची चलाखी..?  — “उल्लू” बनाया समोसा खिलाया…

  रोखठोक

प्रा.महेश पानसे

       घरगुती गॅस सिलेंडर चा आधीही व्यावसायिक कामासाठी वापर सुरू होता व आताही आहे.यामुळे घरगुती गॅस सिलेंडर ची युद्धजन्य परिस्थितीत अधिक वाढल्याचे गणीत चंद्रपूर जिल्ह्यात जाणकार मांडताना दिसत आहेत.

             शासनाने व्यावसायिक गॅसच्या किमती वाढविल्या, पुरवठा नियंत्रित केला अशी बोंब करणाऱ्या हाॅटेल, रेस्टारंट, चहा टपरी, ढाबा, समोसे- पकौडी वाल्यांनी व्यावसायिक गॅस ची नोंदणी केली आहे हे तपासले तर सत्य समोर येणार असल्याचे बोलले जाते.

         घरगुती गॅस ची पळवापळवी सारे व्यावसायिक करतात असे म्हणणे चुकीचे ठरेल मात्र जिल्हा भरात चलाखी करून “, उल्लू ” बनाया समोसा खिलाया म्हणणाऱ्या या व्यावसायिकांची संख्या कमी नाही. मात्र याची झळ मात्र आता सर्व सामान्य जनतेला बसणार असल्याचे बोलले जात आहे. 

           अमेरिका- इराण युद्धाची झळ स्वयंपाक घराला बसू लागली आहे.देशभरातील सर्व सामान्य जनता युद्ध स्तरावर गॅस सिलेंडर मिळण्यासाठी पायपीट करताना दिसत असल्याचे विदारक चित्र दिसू लागले आहे.

             गॅस चा तुटवडा वरून सिलेंडर च्या भडकलेल्या किमती अशा दुधारी तलवारी वर जनता धावपळ करीत असताना चंद्रपूर जिल्ह्यातील हजारो व्यावसायिक भेदरलेल्या जनतेसमक्ष अजूनही घरगुती गॅस सिलेंडर वर आपली पोळी शेकत असल्याचे संतापजनक चित्र बघावयास मिळत आहे.

            जिल्ह्यात या आधीही बहुसंख्य व्यावसायिक घरगुती गॅस सिलेंडर चा सराॅस वापर करीत होती हे सर्वश्रूत आहेच.युद्ध परिस्थितीत घरगुती व व्यावसायिक अशा दोन्ही सिलेंडर चे भाव वधारले आहेत.घरगुती गॅस पुरवठ्याला प्राधान्य देण्याचे शासनाचे धोरण योग्य असले तरी घरगुती गॅस पळवून हाॅटेल, रेस्टारंट,चहा, पकौडी वाले घरगुती स्वयंपाक घराची झळ अजून वाढवतील का? अशी शंका जोरात आहे. व्यावसायिक गॅस चा तुटवडा आहे, भाव वधारले आता खचॅ वाढला म्हणून अनेक हाॅटेल व्यावसायिक यांनी खादयपदार्थाचे भाव वाढविल्याची जिल्ह्यात चचाॅ सुरू आहे.

              अनेक जाणकारांचे मते रेस्टारंट,हाॅटेल व्यावसायिक यांची बोंब निरर्थक असून अजूनही मोठ्या प्रमाणात घरगुती गॅस चा वापर व्यावसायिक कामांसाठी करण्यात येत असल्याचेच स्पष्ट होत आहे.चंद्रपूर जिल्ह्यात रेस्टारंट,हाॅटेल्स,धाबे,चहाटपऱ्या, खानावळी,कॅटरिंग,नास्ता सेंटर यांची संख्या हजारोंच्या घरात आहे. 

                  मात्र जिल्ह्यात व्यावसायिक गॅस नोंदणीदारांची संख्या नगण्य आहे.याचाच अर्थ आजमितीस फार मोठ्या प्रमाणात घरगुती गॅस सिलेंडर चा वापर व्यावसायिक करीत होते व करीत आहेत हे स्पष्ट आहे.

             एकतर हे व्यावसायिक शासनाला ” उल्लू” बनवीत आहेत किंवा घरगुती गॅस चा गैरवापर करीत आहेत हे वेगळे सांगायची गरज नाही.जन चर्चेनुसार जिल्ह्यात घरगुती गॅस चे जेवढे कनेक्शन आहेत त्यातील 25 टक्के गॅस सिलेंडर व्यावसायिक पळवीत आहेत किंवा जिल्हा भरातील गॅस एजन्सी वाले गॅस घोटाळा करीत असावेत असा अंदाज आहे. 

        अमेरिका- इराण युद्धामुळे सदर गॅस घोटाळा जगासमोर येणार आहे.व्यावसायिकांद्धारे पळविण्यात येणारे 25 टक्के घरगुती गॅस सिलेंडर शासनाने सुरक्षित केले तर या युद्धजन्य परिस्थितीत सर्व सामान्य जनतेच्या स्वयंपाक घराला बसलेली झळ आटोक्यात येणार आहे हे संबंधित विभागाने वेगळे सांगायची गरज नाही.

              देशात अंदाजे 33 कोटी घरगुती गॅस कनेक्शन आहेत.म्हणजेच 66 कोटी सिलेंडर चा पुरवठा होतो.चंद्रपूर जिल्ह्याच घरगुती गॅस सिलेंडर ची संख्या अंदाजे लाखाच्या घरात असेल.यातील 25 टक्के घरगुती गॅस सिलेंडर व्यावसायिक पळवीत असतील तर आता युद्धजन्य परिस्थितीत तुटवडा वाढतच जाणार आहे. 

          चंद्रपूर शहरातील 400 हाॅटेल व्यावसायिकांनी व्यावसायिक गॅस चा तुटवडा असल्याची बोंब सुरू केली असली तरी अजून हाॅटेल कुणीही बंद केल्याची तशी नोंद नाही.घरगुती गॅस जिंदाबाद चा नारा देऊन ही मंडळी साऱ्यांना उल्लू बनवित राहील का? हा सवाल कायम आहे.