Home Maharashtra कुरखेडा-कढोली परिसरातील मार्गावर अयोग्य वेळी धावणाऱ्या बसचा विद्यार्थ्यांना बसतोय फटका… —...

कुरखेडा-कढोली परिसरातील मार्गावर अयोग्य वेळी धावणाऱ्या बसचा विद्यार्थ्यांना बसतोय फटका… — अनियमित बस सेवेमुळे शालेय विद्यार्थी झाले त्रस्त…. — बस फेऱ्या नियोजित वेळेत सुरळीत करावे :- भाजपा तालुका अध्यक्ष चांगदेव फाये यांची मागणी….

    राकेश चव्हाण 

तालुका प्रतिनिधी कुरखेडा 

          शालेय विद्यार्थ्यांना तालुक्याच्या केंद्रावर शिक्षणासाठी येण-जाणे करिता परिवहन विभागाने मानव विकास मिशनच्या माध्यमातून बसेसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.

         या बस सुविधेचा लाभ अनेक विद्यार्थी घेत असून बस सुविधांमध्ये अनेकदा अनियमता असून सदर वेळेत बस येत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. 

         त्यामुळे संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देऊन बस फेऱ्या नियोजित वेळेत सुरळीत कराव्यात व विद्यार्थ्यांना होणारा त्रास दूर करावा अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष तथा माजी पंचायत समिती सदस्य चांगदेव फाये यांनी केली आहे. 

             कढोली खरकाडा गांगुली व परिसरातील विद्यार्थी औद्योगिक प्रशिक्षण केंद्र कुरखेडा,स्वर्गीय गोविंदराव मुनघाटे महाविद्यालयांमध्ये व इतर शाळा महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय सुट्टी नंतर घरी जाण्याकरिता परतीची बस 4.30 वाजता असताना,दिनांक 11 मार्च रोज बुधवारला सदर बस रात्री 8 वाजताच्या दरम्यान उशिरा पोहोचली. 

        त्यामुळे विद्यार्थिनींना ताटकळत बस स्थानकामध्ये बसची प्रतीक्षा करत थांबले होते.सदर वेळेत बस स्थानकाचे कुठले जबाबदारी अधिकारी कर्मचारी उपस्थित नव्हते.यामूळे सदर विद्यार्थी त्रस्त झाले होते.

      म्हणूनच विद्यार्थ्यांना होणाऱ्या अडचणीची माहिती भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष माजी पंचायत समिती चांगदेव फाये मिळतात त्यांनी लागलीच कुरखेडा बसस्थानकामध्ये जाऊन संबंधित विद्यार्थ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व संबंधित विभागिय अधिकारी,कर्मचाऱ्यांसोबत संपर्क करून समस्या सोडवण्यासाठी सहकार्य केले.

          कुरखेडा तालुकास्तरावर शिक्षण घेणाऱ्या ग्रामीण भागातील परिसरातील विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण घेण्यासाठी सकाळीच आपल्या घरून शाळेत यावे लागते.

        मात्र परतीच्या मार्गाने जात असताना त्यांना दिलेल्या नियोजित वेळेत बस असणे आवश्यक आहे.परंतु चुकीच्या नियोजनामुळे विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहेत.

           तसेच वयोमनानुसार कुरखेडा येथील बस स्थानक प्रमुख सेवानिवृत्त झाले असल्याने विविध अडचणींना तोंड द्यावा लागत आहे.बस स्थानकामध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या सुद्धा आहे व शालेय पासेस काढण्याकरिता विद्यार्थ्यांना अडचण निर्माण होत आहे. 

        त्यामुळे संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन नियमित बस फेऱ्या सुरळीत करण्याची गरज आहे व विविध प्रलंबित समस्या दूर करणे आवश्यक आहे.

         येथील बस स्थानक प्रमुख श्रीधर शिवाणकर सेवानिवृत्त झाल्यामुळे नविन कर्तव्य दक्ष कर्मचाऱ्यांची नियुत्की करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष तथा माजी पंचायत समिती सदस्य चांगदेव फाये,विद्यार्थ्यांनी व पापालकांनी केली आहे.