Home Maharashtra गडचिरोलीतील शेतकऱ्यांच्या धान चुकार्‍यांचा प्रश्न मंत्र्यांसमोर मांडताच :- तात्काळ देयक अदा करण्याचे...

गडचिरोलीतील शेतकऱ्यांच्या धान चुकार्‍यांचा प्रश्न मंत्र्यांसमोर मांडताच :- तात्काळ देयक अदा करण्याचे निर्देश आमदार रामदास मसराम..

राजेंद्र रामटेके 

 विशेष प्रतिनिधी 

मुंबई : गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या धान खरेदी व चुकार्‍यांच्या प्रश्नावर आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

      अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या दालनात झालेल्या या बैठकीत विविध मतदारसंघांतील आमदार उपस्थित होते.

       बैठकी दरम्यान आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदासजी मसराम यांनी गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना धानाचे चुकारे वेळेत मिळत नसल्याची बाब मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली.

     तसेच धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविणे,धान खरेदी प्रक्रिया अधिक सुलभ करणे आणि ऑनलाईन खरेदी व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी त्यांनी केली.

      यावर मंत्री छगन भुजबळ यांनी आमदारांच्या मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांचे धान चुकारे तात्काळ अदा करण्याचे निर्देश दिले.तसेच भविष्यात शेतकऱ्यांच्या समस्या प्राधान्याने सोडवून त्यांना न्याय देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

       या बैठकीमुळे गडचिरोली जिल्ह्यासह राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून धान खरेदी व चुकारे देण्याच्या प्रक्रियेला गती मिळेल,अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.