शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
चिमूर पोलीस स्टेशनमध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कर्तव्यदक्ष महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा अनोख्या पद्धतीने सन्मान करण्यात आला.
पोलीस निरीक्षक दिनेश लबडे,यांच्या प्रमुख उपस्थितीत हा गौरव सोहळा आनंदमय वातावरणात पार पडला.
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या महिला पोलीसांना याप्रसंगी त्यांना पारंपारिक पद्धतीने आदरपूर्वक फेटा बांधण्यात आला.तसेच पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यात आला.
२४ तास चालणाऱ्या धकाधकीच्या जीवनातील अमुल्य कर्तव्यातंर्गत मिळालेल्या या विशेष सन्मानामुळे सर्व महिला पोलीसांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळाले.
सन्मान सोहळ्याच्या छोटेखानी कार्यक्रमाला पोलीस ठाण्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी आवर्जून उपस्थित होते….



