राजेंद्र रामटेके
विशेष प्रतिनिधी…
कुरखेडा तालुक्यातील मौजा कढोली येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला होता.कार्यक्रमाच्या आयोजना मागचा उद्देश म्हणजे महिलांना त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून देणे होय.
याचबरोबर जागतिक महीला दिनाचे महत्त्व काय? आणि कशासाठी? याबाबतची माहिती महिलांना असणे गरजेचे असल्याने जागतिक महीला दिनाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला आमदार रामदास मसराम यांनी उपस्थित राहून महिलांना शुभेच्छा दिल्या व महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते मोरु मोहुर्ले,सागर वाढई,ईश्वर चौधरी,नलेश्वर आदे,किरण चौधरी,वर्षा गावतुरे,निर्मला मोहुर्ले,शालिनी मेश्राम,आदीं उपस्थित होते.
जागतिक महीला दिनाचे औचित्य साधून महिलांना देण्यात आलेली माहिती त्यांच्या ज्ञानात भर टाकणारी ठरली…



