Home Maharashtra कर्मवीर मा.सां. कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर येथे मराठी भाषा गौरव दिन...

कर्मवीर मा.सां. कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर येथे मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रम संपन्न….

प्रेम गावंडे

  उपसंपादक

दखल न्युज भारत 

                कर्मवीर मा. सां. कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर येथे ज्येष्ठ कवी तथा साहित्यिक कुसुमाग्रज उर्फ वि. वा. शिरवाडकर यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. 

       या मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमाला कर्मवीर मा. सां. कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूरचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे हे अध्यक्षस्थानी होते. यावेळी मंचावर विशेष अतिथी म्हणून  वैद्यकीय अधीक्षक डॉ. निवृत्ती जीवने, तर प्रमुख अतिथी म्हणून क्षयरोग विभागाचे विभाग प्रमुख डॉ. अनिकेत भडके, मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रमोद आगलावे, प्रशासकीय अधिकारी तथा मराठी भाषा अधिकारी संदेश चव्हाण उपस्थित होते. 

         मंचावर उपस्थित सन्माननीय मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी समाजसेवा अधीक्षक राकेश शेंडे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणातून मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यामागील भूमिका विशद केली. कनिष्ठ लिपिक कार्तिक कांबडी यांनी ज्येष्ठ कवी तथा साहित्यिक कुसुमाग्रज उर्फ वि. वा. शिरवाडकर यांच्या जीवन कार्यावर व साहित्यिक कार्यावर प्रकाश टाकले. प्रशासकीय अधिकारी तथा मराठी भाषा अधिकारी संदेश चव्हाण यांनी आपल्या मनोगतातून मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळवून देण्यात कविवर्य कुसुमाग्रजांचा मोठा वाटा आहे. तसेच त्यांनी मराठी भाषेला वैभव प्राप्त करून दिले, त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून दरवर्षी मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो असे मत व्यक्त केले.

           विशेष अतिथी म्हणून उपस्थित असलेले वैद्यकीय अधीक्षक डॉ. निवृत्ती जिवणे त्यांनी आपल्या भाषणात, आपण कितीही भाषा शिकलो, तरी मराठी भाषेतील गोडवा आणि आत्मीयता कमी होत नाही. तेव्हा महाराष्ट्रात फार पूर्वीपासून बोलली जाणारी मराठी भाषेचे संवर्धन करणे, मराठी माणूस म्हणून आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे असे मत व्यक्त केले.

           कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे त्यांनी आपल्या भाषणात बदलत्या काळानुसार इंग्रजी भाषा शिकत असताना मराठी भाषा सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. मराठी ही मायबोली असून तिचे संवर्धन करणे काळाची गरज आहे. तसेच मराठी बोलताना मराठी माणसांनी मनात कोणताही न्यूनगंड ठेवू नये असे मत व्यक्त केले. 

          यावेळी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त घेतलेल्या मराठी भाषा व्याकरण स्पर्धेत प्रथम क्रमांक शेख सौरभ हसन, द्वितीय क्रमांक विभागून कार्तिक कामडी, मिलिंद वागदे, तर तृतीय क्रमांक विभागून वेदांती कांबळे व स्वप्निल येवले यांनी पटकाविला. मान्यवरांच्या हस्ते या क्रमांक प्राप्त कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र व रोख रक्कम देऊन गौरव करण्यात आला.

          कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाजसेवा अधीक्षक हेमंत भोयर यांनी केले तर पाहुण्यांचे आभार प्रदर्शन वरिष्ठ लिपिक बुद्धशिल बहादे यांनी केले. 

            या कार्यक्रमाला शरीररचनाशास्त्र विभागाच्या विभागप्रमुख डॉ. श्रुती मामीडवार, मनोविकृतीशास्त्र विभागाच्या सहयोगी प्राध्यापक डॉ. सायली दाबेराव, औषधवैद्यकशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. निखिल भागवत उपस्थित होते. तसेच तांत्रिक, अतांत्रिक कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी, स्मार्ट सिक्युरिटी सर्विस चे कर्मचारी, चतुर्थ श्रेणी कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते. भास्कर झळके, उमेश आडे, तानाजी शिंदे, भूषण बारापात्रे, गणेश तुपेकर, योगिता माळी, जयश्री भोसले, नवीन उराडे, अमित वानखेडे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले.