राकेश चव्हाण
कुरखेडा तालुका प्रतिनिधी
प्रत्येक वंचित व्यक्तीपर्यंत लाभ पोहचविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान कार्यक्रमाचे शासनाकडून आयोजन करण्यात आले या अभियानाचा लाभ प्रत्येक जनसामान्यांनी घ्यावा असे आवाहन नायब तहसीलदार राजकुमार धनबाते यांनी केले.
कुरखेडा तालुक्यातील मौजा कढोली येथे दिनांक 7 मार्च रोजी तहसील कार्यालयाकडून छत्रपती शिवाजी महाराजस्व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. या कार्यक्रमाला उदघाटक म्हणून दिनकर कुमरे सरपंच बेलगाव व कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री राजकुमार धनबाते हे उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे श्री वैभव आंबेकर नायब तहसिलदार कुरखेडा,श्री सत्यनारायण अनमदवार नायब तहसिलदार,प्रदीप शिंदे नायब तहसिलदार, श्री हुकरे भुमी अभिलेख कार्यालय, संजय रामटेके कृषी विभाग, आहुजा सर प्राचार्य तुकाराम विद्यालय,परम उसेंडी साहेब दुय्यम निबंधक, डॉ शेळके प्रा आरोग्य केंद्र, सोनकुसरे साहेब पुरवठा निरीक्षक, किरण आकरे उपसरपंच कढोली,दडमल साहेब उपसरपंच उराडी, फुकट पाटील गरमळे सभापती आ. वि. सोसायटी, आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात जात प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, शेतकरी प्रमाणपत्र, रेशन कार्ड,संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ सेवा योजना,भो वर्ग 1मंजुरी आदेश, लक्ष्मीमुक्ती योजना आदेश, नाव दुरुस्ती आदेश, घरकुल धारकांना 5 ब्रास मोफत रेती वाटप आदेश,आरोग्य विभागाकडून आरोग्य तपासणी, इतर प्रमाणपत्रांचे वाटप व विविध विभागांच्या योजना व प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना करण्यात आले.
या वेळी उपस्थित मान्यवरांनी नागरिकांना समायोचित मार्गदर्शन केले. विवीध विभागाचे स्टॉल कार्यक्रम स्थळी लावून शासनाच्या योजना नागरिकांना देण्यात आल्या.रुक्मिणी प्रधान व बचत गटाच्या महिलांनी स्वागत गीतांनी पाहुण्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे संचालन प्रविण नैताम ग्राम अधिकारी,प्रास्ताविक वर्षा किरंगे मंडळ अधिकारी व आभार प्रदर्शन प्रशांत मेश्राम ग्राम म. अधिकारी यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी विपुल जगदाळे, श्रुष्टी सडमेक ,बाबलु महाका,दामू नाकाडे, यादव दडमल व सर्व कढोली मंडळातील ग्राम महसूल अधिकारी व महसूल सेवक यांनी मोलाचे सहकार्य केले.



