Home Social संत गाडगे महाराज यांच्या दशसूत्रिची देशाला गरज :- सुरज मंडे…

संत गाडगे महाराज यांच्या दशसूत्रिची देशाला गरज :- सुरज मंडे…

युवराज डोंगरे /खल्लार 

         उपसंपादक 

       संत गाडगेबाबा यांची दशसूत्री देशाला तारक ठरणार आहे. त्याचे पालन शासन स्तरावरून व समाजामध्ये होणे गरजेचे असल्याचे मत अखिल महाराष्ट्र शिक्षक संघांचे प्रसिद्धी प्रमुख सुरज मंडे यांनी जि. प. प्रा. म. शाळा धानोरा (शिक्रा ) येथे संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्य आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावरुन व्यक्त केले.

        कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक दिपक धांडे तर आभार प्रदर्शन शकिलाबाई अंगणवाडी सेविका यांनी पार पाडले. या प्रसंगी प्रज्वल माधुरी सचिन पाटील आणि सुबोध योगीराज टेंबरे या शालेय विद्यार्थ्यांनी गाडगे महारांचा यांचे जीवनकार्यावर प्रकाश टाकला.

         प्रथम शालेय परिसर स्वच्छ करून लख्ख करण्यात आला. गाडगे महाराजांचे प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करून सर्व विद्यार्थ्यांकडून गाडगे महाराज यांचे दशसूत्रीचे पठण करून घेण्यात आले. 

          कार्यक्रमाकरिता तामगगाडगे अश्विनी, अथर्व पडोळे, समर्थ पडोळे, सार्थक चौधरी, विराज, मारब्दे, धनश्री गरड, पलक बद्रे, सान्वी कांबळे, दुर्गा खंबरे, वेदांत गरड, दिव्यानी टेम्भरें, तनवी मालगावे, रीता मालगावे, गौरव शेंडे, पियूष शेंडे, नमन मालगावे, कृष्णा शेंडे, आरव मालगावे, संविधान कांबळे, सार्थक मेश्राम, देविका शिखरे तसेच शाळेचे सर्व आजी व माजी विद्यार्थी उपस्थित होते.