Home Social दर्यापुरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त निघाली भव्य शोभायात्रा…

दर्यापुरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त निघाली भव्य शोभायात्रा…

युवराज डोंगरे /खल्लार 

         उपसंपादक 

         शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने दरवर्षी तिथी प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त दर्यापूर शहरातून भव्य शोभायात्रा चे आयोजन करण्यात आले होते. 

          छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सांप्रदायिक दिंडी, डिजे वर छत्रपती शिवाजी महाराज यांचे गित लाऊन त्यांच्या बद्दल गौरव करण्यात आला. विशेषत: आपल्या समाजातील समाजसुधारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, ए पी जे अब्दुल कलाम,वस्ताद लहुजी साळवे, ज्योतिबा फुले यांच्या कार्यकाळात त्यांच्या सोबत काम करणारे हिंदू खाटीक समाज भूषण डॉ संतुजी रामजी लाड, बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमा ट्रॅक्टर वर लाऊन त्यांच्या कार्याचा उजाळा करण्यात आला. 

         प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून भव्य मिरवणूकीची सुरुवात करण्यात आली. गगनचुंबी घोषणा देत फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली.

          यावेळी आमदार गजानन लवटे, युवासेना जिल्हा प्रमुख अंकुश पाटील कावडकर, छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष बबनराव विल्हेकर, सचिव प्रदीप वडतकर, तालुका प्रमुख प्रमोद धानोरकर, निलेश पारडे, गुणवंत गावंडे, किशोर टाले, मोहन बायस्कर, सागर गिरहे, रुपेश मोरे, सतिश साखरे, भास्कर थोटे, निलेश होले, अमोल गावंडे, नितेश गावंडे, गोपाल अग्रवाल, दिपक बगाडे, अमोल अरबट, संजय कोरडे, हरिदास ठाकरे,शरद गावंडे, शादाब सुपी, अमन पटेल, संदीप धर्माळे, प्रशांत धर्माळे, सतिश जामनिक, सुनिल पाचडे, मोहन खरबडकार, शुभम विल्हेकर, आशिष लायडे, पंकज राणे, राज गुजराती, करण चक्रे, राजू मानकर, विलास गिरहे, रमेश बुंदिले, भगवान उटाळे, प्रविण पारडे, गौरव आवारे, कुलदीप चौधरी, वेदांत साखरे,संदीप शेळके, अंकुश साबळे, शरद आठवले, मंगेश पारडे, दत्ता लाजुरकर, संतोष हागे, प्रविण बायस्कर, मंगेश धुराटे, खंडू राऊत, सौरभ वायझाळे तसेच हजारोंच्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.