ऋषी सहारे
संपादक
आरमोरी :-
महाराष्ट्र राज्य किसान सभा व महाराष्ट्र राज्य लालबावटा शेतमजूर युनियन, तालुका आरमोरी मार्फत शेतकरी, शेतमजूर यांच्या विविध मागण्या साठी तहसील कार्यालय आरमोरी समोर दिनांक 20- 4-2026 ला धरणे आंदोलन करण्यात आले.
यात शेतकरी व शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन पंतप्रधान, भारत सरकार नवी दिल्ली व मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य ,मुंबई यांना तहसीलदार आरमोरी यांच्यामार्फत पाठवण्यात आले. भारत -अमेरिका व्यापार करार केंद्र सरकारने केलेला आहे तो शेतकऱ्यांना हमीभाव नाकारणार आहे भारतीय बाजारपेठेत अमेरिकेचा शेतीमाल जर आला त्या स्पर्धेत भारतीय शेतकरी टिकणार नाही व जो काही भाव भारतीय शेतकऱ्यांना मिळत आहे तोही हमीभाव शेतकऱ्यांना मिळणार नाही त्यापासून तो वंचित राहील आणि म्हणून भारत अमेरिका व्यापार करार केंद्र सरकारने रद्द करावा.
केंद्र सरकारने जुना मनरेगा हा रोजगार मिळवून देणारा कायदा रद्द करून व्ही. बि. रामजी हा नवीन कायदा आणला या कायद्याने ग्रामीण भागातल्या शेतमजुरांचा रोजगार या कायद्याने हिसकावून घेतला आणि म्हणून हा कायदा रद्द करून जुनाच रोजगार देणारा मनरेगा कायदा कायम ठेवावा, ग्रामीण भागामध्ये व शहरी भागामध्ये घरकुल यासाठी मिळणारा आर्थिक सहाय्य फारच कमी आहे, घरकुल बांधण्यासाठी शासनाने पाच लाख रुपये लाभार्थ्यांना द्यावे, अमेरिका व इस्त्राईल यांनी इराणवर केलेल्या आक्रमणामुळे जगभर महागाई वाढत आहे देशातही महागाई वाढलीआहे.
गॅसचा पुरवठ्यावर फार मोठ्या परिणाम जाणवत आहे त्यामुळे अमेरिका व इस्त्राईल यांनी आक्रमणे थांबवावी यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा ,वाघाच्या हल्ल्यात जिल्ह्यामध्ये शेतकरी बळी जात आहेत यावर उपाययोजना करा, शेतकरी,शेतमजुरांना मासिक 5000 रुपये पेन्शन मिळण्याचा कायदा करावा, ग्रामीण भागातील सरकारी मराठी शाळा बंद करण्यात येऊ नये,पी एस सी स्तरावरील आरोग्यवस्था अद्यावत करावी व शासनाने लावली तपासणी शुल्क रद्द करावे.
शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव द्यावा, धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस द्यावा शेतकरी ,शेतमजूर आणि कामगार यांची सरसकट कर्जमाफी करावी ,शासकीय मका खरेदी केंद्र त्वरित सुरू करावे , जबरानजोतन धारकांना जमिनीचे पट्टे द्या आधी मागण्या या निवेदनातून करण्यात आल्या.
या आंदोलनाचे नेतृत्व डॉ. महेश कोपुलवार राज्यकार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य किसान सभा ,प्रकाश खोब्रागडे जिल्हा अध्यक्ष लाल बावटा शेतमज युनियन, प्रशांत खोब्रागडे जिल्हा सचिव लालबावटा शेतमजूर युनियन,केवळ राम नागोसे,ता.अध्यक्ष, किसान सभा, मिनाक्षी सेलोकर जिल्हा अध्यक्ष , महिला फेडरेषण, सिंधू काटकर नगरसेविका,चुन्नीलाल मोटघरे , ऋषी रामटेके ,डंबाजी नरुले, हरिदासजी निखुरे ,भगवान राऊत, मनोज दामले, राजाराम मडावी आदी प्रमुख कार्यकर्ते सहभागी होते.


