Home देशविदेश इस्राएल / अमेरिका V/S इराण युद्धाचे परिणाम, जर तिसऱ्या जागतिक अंतिम अणूयुद्धात...

इस्राएल / अमेरिका V/S इराण युद्धाचे परिणाम, जर तिसऱ्या जागतिक अंतिम अणूयुद्धात झालेच तर,याला सर्वसामान्य जनता जबाबदार नसून केवळ आणि केवळ जागतिक बुद्धीजीवी वर्गच असेल …….!  — भाग = 01

        जगातील एकूण 205 देशांपैकी 193 देश युनोची सदस्ये आहेत. त्यात फ्रांस, अमेरिका, ब्रिटन ( इंग्लंड ), रशिया आणि चीन ही पाचही राष्ट्रे जगातील प्रथम अन्वस्त्रसज्ज देश आहेत.

        त्यामुळे अणूयुद्धाची शक्यता अजून जास्त प्रमाणात वाढलेली आहे. 

         ही जी आज जागतिक अणूयुद्धाची शक्यता वाढलेली आहे, तीचे मुख्य कारण काय असेल? तर तीचे मुख्य कारण हेच की जगातील सर्वसामान्य जनता आणि जागतिक मानवतावादी तत्ववेत्ते आणि महापुरुष ( ज्यांनी मानवतेच्या कल्याणासाठीच सर्वस्व समर्पित केले ) यांच्यातील *दुवा*( माध्यम ) असलेला हा *बुद्धीजीवी वर्गच* अनैतिक, षंढ, नेभळट आणि अनितीमान निघाला. म्हणूनच ही जागतिक अणूयुद्धाची जागतिक टांगती तलवार निर्माण झाली.

          कारण, जगातल्या प्रत्येक देशाची सर्वसामान्य जनता ही लोकशाही तत्वानुसार किंवा कोणत्याही सत्ताप्रकारानुसार निरागस असते. आणि जे सत्ताधारी असतात ते साम, दाम, दंड आणि भेदाचा वापर करून लोकशाही मूल्ये ( स्वातंत्र्य, समानता, न्याय आणि बंधुता ) पाययदळी तुडवून सत्तेच्या बळावर जनतेच्या हतबलतेचा आणि अज्ञानाचा लाभ उठवत देशाला देशोधडीला लावतात. याचेच अतीउच्चं टोक म्हणजे आजची ही जागतिक अणूयुद्धाची निर्माण झालेली शक्यता आहे.

        जागतिक सत्ताधारी मग ते हुकूमशहा असोत, किंवा राजेशाही असोत, किंवा लोकशाहीवादी असोत. या सर्वप्रकारच्या सत्ताधारी मंडळीचा त्या त्या देशात चाललेला सर्वप्रकारचा भ्रष्टाचाराचा व अनितीचा खेळ हा प्रथम समजतो तो वेगवेगळ्या विषयात तज्ञ् असलेल्या बुद्धीजीवी वर्गाला. कारण त्यांना सर्वप्रकारचे ज्ञान असते. परंतू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इशाऱ्यानुसार आपण समजून घेऊ.

   “शिक्षण हे वाघीणीचे दूध आहे. ते जो कुणी प्राशन करील, तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही”

  आणि “शिक्षण हे दुधारी तलवारी सारखे आहे. ती स्वतःबरोबर इतरांचेही संरक्षण करते. ” :-डॉ. बाबासाहेब आंबेडकर

              वरील इशाऱ्यानुसार जागतिक स्तरावरील निदान प्रत्येक लोकशाहीवादी देशातील विविध विषयातील तज्ञ् यांच्या मुळाशी मानवतावाद असलाच पाहिजे. आणि तो असतोच. पण त्याची अंमलबजावणी करण्याची नैतिक ईच्छा त्याच्याकडे नसते. कारण त्या वर्गाला सत्ताधारी वर्ग आपलेसं करण्यासाठी विविध पुरस्कार, सन्मान, पदे देऊन त्याच्या अहंकाराला पोषक असे सर्वकाही देऊन त्या वर्गाला आपलेसे करतात. नव्हे गुलाम करतात. जेणेकरून त्या त्या देशातील सत्ताधारी कसेही वागो, कितीही निरागस जनतेवर अन्याय अत्याचार करो, त्यांच्या अज्ञानाचा, हतबलतेचा कितीही लाभ उठवो याकडे या बुद्धीजीवी वर्गाने दुर्लक्ष करावे आणि सत्ताधाऱ्यांकडून मिळालेल्या बिदागीत खुश राहून षंढपणे जीवन जगावे. एवढेच नव्हे तर जनतेची पिळवणूक – शोषण करण्यासाठी आणखी नवीन – नवीन मार्ग विकृत मेंदूतून शोधून ते सत्ताधाऱ्यांना पुरवण्याचे काम सुद्धा करावे हीच ईच्छा या सत्ताधारी वर्गाची असते. अशा प्रकारच्या बुद्धीजीवी वर्गाला सॉक्रेटीस भाडोत्री विचारवंत म्हणतात. म्हणून जागतिक बुद्धीजीवी वर्ग हा सत्ताधाऱ्यांचा गुलाम होऊन बसल्यामुळे तो वर्ग आपली अभिव्यक्ती गमावून बसला आहे.

          म्हणूनच तर 50% / 60% डिस्काउंट देऊन सुद्धा यांची पुस्तके कुणी फुकट सुद्धा घ्यायला कुणी तयार होत नाहीत……!

       कारण यांच्या पुस्तकात जागृतीच्या अणुबॉम्बचे शब्द कुठेच नसतात……

         केवळ मानसिक गुलामीचेच पाठ असतात. पुरस्कारासाठी……

       या आजच्या ( 2026 ) जागतिक बुद्धीजीवी वर्गाला मी का दोष देत असेल…….?

          कारण…….

          व्हाल्टेअर, रुसो, मॉन्टेस्क्यू, दीदेरो यासारख्या बोटावर मोजता येण्याइतक्या मानवतावादी बुद्धीजीवी विचारवंतांनी फ्रांसमधील 95% जनतेचं वैचारिक नेतृत्व केलं. बलाढ्य लुई घराणेशाही आणि अमीर उमराव यांच्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात जनतेत जागृती केली. केवळ जागृती करूनच थांबले नाहीत तर जनतेसोबत रस्त्यावर उतरून नेतृत्व केलं. म्हणून तर फ्रेंच राज्यक्रांती यशस्वी होऊ शकली……….!

           परंतू , फ्रेंच राज्यक्रांतीचे महत्व आजचे इतिहासाचे प्राध्यापक केवळ परीक्षेत पास होऊन 100% मार्क्स कसे मिळवता येईल या शिकवणुकीपुढे कधीच जात नाहीत.

         अगदी अशीच परिस्थिती आज जागतिक बुद्धीजीवी वर्गाची आहे. म्हणूनच तो 100% दोषी आहे.

    दुसरे असे की……..

         जगात अमेरिकन राज्यक्रांती, फ्रेंच राज्यक्रांती, रशियन राज्यक्रांती, जपानची मेईजी क्रांती या आधुनिक काळातील रक्तरंजित क्रांत्यांचा जागतिक इतिहास आहे. 

         अशा रक्तरंजित क्रांत्या पुन्हा कुठेही होऊ नये म्हणूनच तर जगाने लोकशाही शासन व्यवस्था स्वीकारली ( भलेही 100% टक्के नसली तरी 1% टक्क्यात सुद्धा बरीच शक्ती असते ).

         अगदी याच तत्वानुसार जेंव्हा पहिले जागतिक महायुद्ध घडले. 1914 ते 1918 या चार वर्षात झाले. असे जागतिक महायुद्ध घडूच नये म्हणून दोस्त राष्ट्रानी ( जे लोकशाहीवादी होते ) अर्थात इंग्लंड, अमेरिका, फ्रांस इ. देशांनी मिळून जगात कायम शांतता सुव्यवस्था राहावी म्हणून राष्ट्रसंघाची स्थापना 1920 मध्ये केली. 

            परंतू , अवघ्या 20 वर्षाच्या काळात जर्मनीच्या हिटलरने या राष्ट्रसंघाला मोडीत काढले……!

         तेंव्हाच जर जागतिक बुद्धीजीवी वर्गाने एकत्र येऊन ठरवले असते की या राष्ट्रसंघाच्या संविधानानुसार प्रत्येक देशाने आचरण केलेच पाहिजे. त्यासाठी त्या त्या देशातील ( जर्मनीसहित ) सत्ताधारी वर्गाला या बुद्धीजीवी वर्गाने आचरण करायला भाग पाडलं असतं आणि तशी त्या त्या देशातील जनतेत जागृती केली असती, तर राष्ट्रसंघ नष्ट होऊन हिटलरने जगावर दुसरे महायुद्ध लादलेच नसते…….!

      दुसरे महायुद्ध 1939 ते 1945 पर्यंत लढले. पहिल्या महायुद्धापेक्षा कित्येक पटीने हे संहारक युद्ध झाले. हिटलरच्या आत्महत्येबरोबरच दुसऱ्या महायुद्धाचाही शेवट झाला.

       त्यानंतर राष्ट्रसंघाच्या कल्पनेवर पुन्हा एकदा संयुक्त राष्ट्र संघटनेची ( युनोची ) स्थापना झाली. 

   आणि या युनोचे अस्तित्व आज संपुष्टात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे………!

टीप :- तेंव्हा 1945 पासून ते आज 2026 पर्यंतच्या जागतिक इतिहासाचा मागोवा उद्याच्या भागात…….

लेखक आणि आवाहनकर्ता 

      अनंत केरबाजी भवरे

संविधान विश्लेषक, रेणापूरकर, औरंगाबाद, 7875452689