Home Social आमदार किर्तीकुमार भांगडिया यांना दिले निवेदन…  — चिमूर शहरात मुस्लिम बांधवासाठी...

आमदार किर्तीकुमार भांगडिया यांना दिले निवेदन…  — चिमूर शहरात मुस्लिम बांधवासाठी सभागृह निर्माण करण्याची केली मागणी…

शुभम गजभिये

  विशेष प्रतिनिधी

         चिमूर शहरातील मुस्लिम बांधवानी आमदार किर्तीकुमार भांगडिया यांची भेट घेऊन मुस्लिम समाजाच्या कार्यक्रमासाठी सभागृह बांधकाम मंजूर करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली.

       मुस्लिम बांधवांकडे सभागृहाचे बांधकाम करण्यासाठी मालकी हक्काची जागा नसल्याने,जागा उपलब्ध करून द्यावी,अशी आग्रही मागणी केली.

      आमदार बंटीभाऊ भांगडिया यांनी आपल्या योग्य नियोजनातून विविध समाजासाठी सभागृहाची निर्मिती केली,त्याच धर्तीवर मुस्लिम बांधवांसाठी एक प्रशस्त सभागृह निर्माण करण्याची मागणी केली.

       चिमूर येथील सामाजिक कार्यकर्ता पप्पुभाई शेख व अनेक मुस्लिम बांधवानी आमदार बंटीभाऊ भांगडिया यांच्याकडे सदर मागणी केली.

          निवेदनाची दखल घेत चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटीभाऊ भांगडिया यांनी सुद्धा लवकरात लवकर चिमूर शहरात भरीव निधीचे प्रशस्त सभागृह मंजूर करण्याचे आश्वासन चिमूर येथील मुस्लिम बांधवांच्या शिष्टमंडळाला दिले.

         यामुळे चिमूर येथे मुस्लिम बांधवासाठी भव्य सभागृह निर्माण होत असल्याने चिमूर येथील समस्त मुस्लिम बांधवानी आमदार बंटीभाऊ भांगडिया यांचे आभार व्यक्त केले आहे.