ऋग्वेद येवले
उपसंपादक/जिल्हा भंडारा..
नवजीवन कॉन्व्हेन्ट अँड इंग्लिश प्रायमरी स्कूल (सीबीएसई) जमनापूर/साकोली येथे,मराठी राजभाषा गौरव दिन,मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमास शाळा व्यवस्थापक विनोद किरपान, प्राचार्या भारती व्यास,प्रशासकीय अधिकारी सतीश गोटेफोडे व पर्यवेक्षिका वंदना घोडीचोर यांची उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व मराठी भाषेच्या गौरवगीताने करण्यात आली.
यावेळी विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचे महत्त्व,समृद्ध परंपरा आणि सांस्कृतिक वारसा यावर आधारित भाषणे सादर केले.
मराठी भाषा ही आपल्या अभिमानाची आणि ओळखीची भाषा असून तिचा जप व प्रसार करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे,असा संदेश कार्यक्रमातून देण्यात आला.
मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून मराठी भाषेच्या संवर्धनासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहावे,असे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेबद्दल अभिमान व आपुलकी निर्माण झाली.



