अमान कुरेशी
जिल्हा प्रतिनीधी चंद्रपूर
पवित्र रमजान महिन्यानिमित्त सिंदेवाही येथे नगर सेवक पंकज नन्नावार तर्फे भव्य इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला काँग्रेस शहर अध्यक्ष सुनील उट्टलवार,नगराध्यक्ष भास्कर नन्नावर,नगरसेवक दिलीप रामटेके,सामाजिक कार्यकर्ते,जामा मस्जिद कमेटी चे अध्यक्ष अमान कुरेशी,सचिव युनूस शेख,सह सचिव समीर पठाण,गायबसदर अशपाक शेख,मेम्बर सहजाद पठाण,सम्मी कुरेशी,सलमान पठान,साहिल शेख,वाजीद कुरेशी,तय्यब शेख,कदीर शेख तसेच समाज बांधव,पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सूर्यास्तानंतर अजान झाल्यानंतर रोजेदारांनी खजूर व पाण्याने रोजा सोडत इफ्तार केला.त्यानंतर सर्वांसाठी विशेष भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी रमजान महिन्याचे महत्व सांगत समाजात शांतता,बंधुभाव आणि ऐक्य टिकवण्याचे आवाहन केले.
इफ्तार पार्टी ही केवळ धार्मिक परंपरा नसून सामाजिक सलोखा वाढवणारा उपक्रम असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले होते.आयोजकांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले.



