बाळासाहेब सुतार
निरा नरसिंहपूर प्रतिनिधी
जय भवानीगड विकास प्रतिष्ठानचे संस्थापक, अध्यक्ष तसेच नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य श्री. श्रीमंत ढोले यांनी आज दिनांक 20/02/2026 पासून सुरू झालेल्या दहावीच्या परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांना यशवंत, गुणवंत व्हा अशा शुभेच्छा दिल्या.
आजपासून माध्यमिक शालांत SSC परीक्षा सुरू होत आहेत, विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यास आकार देण्याचा हा अतिशय महत्त्वाचा टप्पा असून सर्वानी आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जावे, ही परीक्षा सर्वाना सोपी जावी व उत्तम गुणप्राप्ती मिळावी.
यशस्वी भव!
हा शुभेच्छा संदेश संस्थेचे अध्यक्ष या नात्याने दिला.
तसेच प्रशालेतील परीक्षेसाठी येणार्या प्रत्येक विद्यार्थ्यांला writing pad, पेढा व गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
परीक्षार्थी विद्यार्थी प्रशालेमध्ये आल्यावर त्यांचे औक्षण करण्यात आले.
सदर कार्यक्रमासाठी अध्यक्ष श्रीमंत ढोले, उपाध्यक्ष चित्रलेखा ढोले, सचिव हर्षवर्धन खाडे, विश्वस्त पृथ्वीराज ढोले, ऋषिकेश ढोले, विद्या निकेतन स्कूल अॅण्ड जुनियर कॉलेज लाखेवाडीचे प्राचार्य गणेश पवार,प्रेसिडेंसी इंटरनॅशनल स्कूल चे प्राचार्य राजेंद्र सरगर , शिक्षक, परीक्षार्थी विद्यार्थी उपस्थित होते.



