ईश्वर आहे की नाही? असेल तर तो कसा आहे ? निर्गुण आहे की सगुण आहे ? आकार्य आहे की निराकारी आहे? सुखी आहे की स्थूल आहे? यावर भक्तिमार्गातील लोकांचा वाद आहे, ईश्वराचे भक्त कोणी त्यास निर्गुण समजून मूर्ती पूजा मान्य करीत नाहीत, तर कोणी त्यास सगुण समजून मूर्तिपूजा करतात. सगुण निर्गुण, सूक्ष्म स्थूल, हा ईश्वराबद्दलचा विचार आणि वाद मुस्लिम हिंदू आणि इतर काही धर्मामध्ये आहे, अर्थात कोणी सगुण भक्ती करतात तर कोणी निर्गुण भक्ती करतात, सगुण भक्ती करणारे म्हणजेच मूर्ती पूजा करणारे, आणि निर्गुण भक्त म्हणजे ज्यांना मूर्ती पूजा मान्य नाही असे भक्त.
अखेर कोणती भक्त असले तरी शेवटी ते देवाचे अस्तित्व मान्य करतात, अस्तित्व याचा अर्थ असणे हा आहे, म्हणजेच देव आहे की नाही? याचे उत्तर देव आहेच असे म्हणणारे ते देवभक्त. मग त्यांची भक्ती सगुण असेल की निर्गुणाचे, सूक्ष्म असेल की स्थूल असेल.
आता आपण यातील फरक जाणून घेऊया, गुण याचा अर्थ रूप चव रंग आणि स्पर्श म्हणजे जाणवणे, आणि ऐकायला येणे, याचा अर्थ कान नाक जीभ डोळे आणि माणसाची त्वचा या पंचन्द्रयाने कोणत्याही सजीव आणि निर्जीव गोष्टीचे किंवा वस्तूचे ज्ञान होते, माहिती होते, अनुभव होतो. याचा अर्थ गुणाचे ज्ञान हे या पंचंद्रियाद्वारे माणसास होत असते, रंग आणि रूप डोळ्याने पाहता येते, गंध म्हणजे वास उदाहरणार्थ फुलाचा वास तो डोळ्याला दिसत नाही परंतु नाकाने तो अनुभवता येतो, तसेच माणसाचा स्पर्श किंवा ऊन वारा पाऊस यांचा स्पर्श माणसाला त्याच्या त्वचेला होतो त्यातून अनुभव घेता येतो, हवा दिसत नाही परंतु त्याचा त्वचेला स्पर्श होतो म्हणजे जाणीव होते, त्यातून हवेचा अनुभव घेता येतो किंवा वाऱ्याचा अनुभव घेता येतो, अग्नि डोळ्याला दिसते आणि त्वचेला जाणवते पण.
आता अग्नीत देव आहे, वारं देव आहे, असे असेल तर अग्नी आणि वारा जसे दिसतात आणि जाणवतात तसे मात्र देवाचे नसते, म्हणून देवाची जाणीव होते किंवा अनुभूती येते किंवा अनुभव मिळतो असे होत नाही, नाकाने देवाचा गंध येत नाही, डोळ्याने त्याचे रूप आणि रंग कसे आहे ते दिसत नाही, यावरून तो सगुन नाही, असा त्याचा अर्थ होतो, म्हणून त्याचे सगुण रूप बघायचे असेल तर, काही भक्त देवाचे दर्शन घेण्यासाठी उत्सुक झाले किंवा त्यांना धीर धरता आला नाही, ते अधीर झाले, त्यांना देवाचे सगुण रूप पाहिल्याशिवाय समाधानच मिळणार नव्हते, म्हणून देवाला सगुणरूप देण्याची संकल्पना कोणालातरी सुचली असेल, त्यातून मूर्तिपूजा ही सुरुवात झाली असेल, असे असले तरी निर्गुणाचे काय? हा प्रश्न शेवटी उभाच राहतो. संत तुकाराम महाराजांनी सगुण निर्गुण याची व्याख्या करताना म्हणाले की, सगुण काय किंवा निर्गुण काय, दोन्ही एकच आहेत,” सगुण निर्गुण दोन्ही एकची रे , सूक्ष्म स्थूल दोन्ही एकची रे, म्हणजे भक्ती करताना सगुण निर्गुण हा भेद न करता ज्यांना जसा अहवा आहे ज्यांना जसा देवाला बघायचा आहे, तशी तुम्ही तुमच्या दृष्टीने देवाला बघा, वाद करू नका, भांडणे मारामाऱ्या करू नका, देव हा भांडणाचे मारामाऱ्याचे कारण करू नका, ज्याला जसा भावला तसा माना, असा तोडगा तुकाराम महाराजांनी व्यवहारिक तोडगा काढला, तरीपण अजूनही सगुण निर्गुण याबद्दल वाद प्रत्येक धर्मामध्ये करून ज्यांची त्यांचे देवळे मज्जिद दर्गा आणि चर्च वेगवेगळे आहेत, देवाला समोर करून आपण आपली भांडणाची इच्छा पूर्ण पूर्ण करून घेत आहोत, खरे तर जात असो धर्म असो की देव असो. हे भांडणाचे कारण होऊ शकत नाही, मात्र भांडण करण्यासाठी या तिन्ही गोष्टी” बहाना” म्हणून धूर्त लोक क याचा वापर करीत असतात आणि यातून आपला सत्ता संपत्ती प्रतिष्ठा जोपासण्याचे काम करतात. हे सर्व सामान्य बुद्धीच्या माणसाला लक्षात येत नाही, म्हणून देव धर्म आणि जात या तीन गोष्टी या स्वार्थी आणि धूर्त लोकांनी शोषण करणाऱ्यांनी निर्माण केल्या त्यास आपण बळी पडून एकमेकांचे जीव घेत आहोत, त्यातून आपले शोषण होत आहे, आपल्यावर अन्याय होत आहे, आर्थिक सामाजिक राजकीय धार्मिक सांस्कृतिक शोषण आणि अन्याय होतो आहे, हे सर्वसामान्य बुद्धीच्या लोकांना लक्षात येत नाही. आज कितीही डॉक्टर इंजिनियर वकील इत्यादी विद्याविभूषित लोक असले तरी देव धर्म जात यामागचे राजकारण त्यांच्या लक्षात येत नाही, याबद्दल खंत करावीशी वाटते. किंवा त्यांची क्यू पण येते.
ईश्वर ” सूक्ष्म ‘ आहे, म्हणजे तो डोळ्याला दिसत नाही, असे जरी म्हटले, तरी किमान त्याची जाणीव तरी व्हायला पाहिजे, जसे की हवा अग्नी पाणी प्रमाणे, तशी पण होत नाही, म्हणून तो सूक्ष्म आहे की नाही ? अशी शंका निर्माण होणे रास्त आहे. आणि तो जर निर्गुण असेल तर मग त्याची जाणीव तरी कशी होणार? या प्रश्नाचे उत्तर,’ नाही ‘ हेच असणार आहे. आणि ईश्वराचे अस्तित्व सूक्ष्म आहे असे जरी मानायचे ठरविले तरी, सूक्ष्म म्हणजे लहान अत्यंत लहान की जे डोळ्याला दिसू शकत नाही, असे त्याचे अस्तित्व सूक्ष्म असेल, तरी का होईना त्याचे अस्तित्व आहे असे एकदा मान्य केले तर मग, प्रश्न असा पडतो की, ज्याचे अस्तित्व असते, ती गोष्ट असो की वस्तू असो की एखादा पदार्थ असो, ज्याला अस्तित्व आहे, त्यास स्पेस पाहिजे, अस्तित्वासाठी जागा पाहिजे, त्याला वजन असते, that means certainly its may should be ” space and weit ‘. हा फिजिक्स विद्यान चा नियम आहे.म्हणजे विज्ञानाशी सांगते की, अस्तित्व याचा अर्थ ज्याला जागा आणि वजन असते त्यास अस्तित्व असे म्हणतात, अस्तित्व याचा अर्थ असणे होय. असणे म्हणजे डोळ्याला दिसणे, कानाला ऐकू येणे, त्वचाला स्पर्श होणे, नाकाला वास येणे, किंवा बुद्धीला तर्क होणे, तो तर्क व्यवहारी पातळीवर सिद्ध करून दाखवणे, म्हणजे विज्ञानाचे प्रयोग, किंवा अनुभव, याद्वारे सिद्ध करायचे असते, कारण तर कालही आधार लागतो, नाहीतर माणसाची बुद्धी ही काही पण तर्क करू शकते, त्या तारकाला पुरुष द्यावा लागतो, साक्षी द्यावी लागते. कोर्टातील सर्व केसेस खरे की खोटे, ठरवायचे असल्यास तर्क, तर्काचा आधार द्यावा लागतो, असेच हे देवाचे आहे.
ईश्वराचे अस्तित्व, हा विषय जर कोर्टात नेला तर, ईश्वर आहे म्हणणारा एक पक्ष आणि त्याचा वकील, ईश्वर नाही म्हणणारा दुसरा पक्ष आणि त्याचा वकील, या दोघांनी पण ईश्वराचे अस्तित्व सिद्ध करून दाखवायचे असेल तर ते दोन्ही वकील कोणता तर कधी देतात? त्या त्या तर्काला कोणते साक्षीदार देतात? ते साक्षीदार खोटे असतात की खरे असतात यावरून पण त्या केस चा निकाल लागू शकतो, तसेच तर सिद्ध करण्यासाठी दिलेले पुरावे पण व्यवहारीक असावे लागतात, तरच त्यातील सत्य असत्य उघड होत असते, जर साक्ष पुरावे आणि कागदपत्रे चुकीचे असतील तर निर्णय पण चुकीचाच लागतो.
या सर्व गोष्टी ध्यानात घेता असे समजते की, ईश्वराचे अस्तित्व आहे की नाही ? असेल तर त्यास सूक्ष्म म्हणावे की स्थूल म्हणावे? निर्गुण म्हणावे की निराकार म्हणावे? सूक्ष्म भक्ती श्रेष्ठ की स्थूलभक्ती श्रेष्ठ? की भक्तीमध्ये श्रेष्ठत्व आणि कनिष्ठत्व येऊ नये? त्या सर्व प्रश्नांचे उत्तर आपणास मिळू शकेल.
माणसाला जनावरापेक्षा जास्त बुद्धी आहे, ती प्रवाही आहे, प्रवाही असली पाहिजे, म्हणजेच विचार करीत राहायला पाहिजे, जो माणूस आपल्या जीवनात घडणाऱ्या गोष्टींचा, समस्यांचा, विचारच करत नाही, त्याचे विचार प्रवाही नसतात, म्हणजेच पाण्याला बांध घालून अडविल्यानंतर साचलेल्या पाण्यात जसे अनेक विकार होतात, पाणी दुर्गंधी होते, तसे माणसाची विचार पण होतात, विचार एकदा घाण झाले की मग माणसाची प्रगती होण्याऐवजी अधोगतीच होत असते, आपल्या जीवनात देव धर्म जात या गोष्टी आल्या, परंतु त्या कुणी आणल्या? का आणल्या? त्या मागचा त्यांचा उद्देश काय होता ? आणि जरी ह्या गोष्टी आपल्या जीवनाशी निगडित झालेल्या असतील, तरी याचे सु परिणाम कोणते? आणि दुष्परिणाम कोणते? यावर माणसांनी विचार केला पाहिजे. कारण आपल्याला बुद्धी आहे. मेंदू आहे. पण त्याचा वापर नाही केला तर, त्याचा वापर इतर दुष्ट कपटी लोक करून ते आपला स्वार्थ साधतात आणि आपला त्यात हकनाक बळी जातो, आपले फार मोठे नुकसान होऊन बसते, आयुष्य बरबाद होते.
आपल्या जीवनात कोणत्याही गोष्टी येऊ देत, कोणतेही प्रसंग येऊ देत, कोणत्याही समस्या उद्भव देत, परंतु त्या तपासने आवश्यक आहे, अशा गोष्टीचा आपल्या जीवनाशी काही संबंध नसेल तर अशा गोष्टींना करायलाच पाहिजे. तरच आपले नुकसान होणार नाही. आर्थिक सामाजिक कोणतेच नुकसान होणार नाही. ज्या गोष्टी व्यवहारामध्ये काहीच उपयोगाच्या नाहीत, अशा गोष्टींचा वापर करणे टाळले पाहिजे. ज्या गोष्टीमुळे आपणास आर्थिक लाभ होतो, समाज स्वास्थ्य ठीक राहते, आपली भौतिक आणि मानसिक अवस्था ठीक राहते, अशाच गोष्टींचा स्वीकार करायचा, अन्यथा त्यांचा स्वीकार करायचा नाही. एवढी साधी गोष्ट जरी माणसाला कळली, तरी देव आहे की नाही? मग तो सूक्ष्म आहे की स्थूल आहे, निर्गुण आहे की निराकार आहे, त्यानंतरच्या गोष्टी आहेत, आधी सर्वात महत्त्वाची गोष्ट ही की, माणसाला देवाची गरज किंवा आवश्यकता आहे की नाही? याचा आधी स्वाक्षमोक्ष केला पाहिजे. आणि त्याची गरज असेल तर का आहे? नसेल तर का नाही? हे सिद्ध केले पाहिजे.


