Home Social मुनघाटे महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा…

मुनघाटे महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा…

भाविकदास करमनकर 

  धानोरा तालुका प्रतिनिधी 

           धानोरा येथील श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था गडचिरोली व्दारा संचालित श्री जीवनराव सिताराम पाटील मुनघाटे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात डॉ. चंद्रशेखर वेंकट रमन यांनी रमन इफेक्टचा शोध लावल्याने त्यांच्या सन्मानार्थ राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

          याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.विणा जम्बेवार तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ.राजू किरमीरे, डॉ. दामोधर झाडे मंचावर उपस्थित होते.

          कार्यक्रमाची सुरुवात डाॅ.सी व्ही रमन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने करण्यात आली. यावेळी डॉ.जम्बेवार मॅडम यांनी उपस्थित सर्वांना विज्ञान दिनाच्या शुभेच्छा प्रदान करून विज्ञान दिनाचे महत्त्व पटवून दिले यावेळी उपस्थितांची समायोजित भाषणे झाली.

             कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक प्रा.मांतेश तोंडरे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ.सचिन धवनकर यांनी केले.

            यावेळी डॉ.पंकज चव्हाण, डॉ.गणेश चुदरी, डॉ. पंढरी वाघ, डॉ. हरीष लांजेवार, डॉ.संजय मुरकुट,डॉ.नितेश पुण्यप्रेड्डीवार, डॉ.प्रियंका पठाडे यांची उपस्थिती होती.

            कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी राकेश बोंगीरवार यांच्यासह भास्कर वाढणकर आणि बहुसंख्य विद्यार्थी यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.