Home Social शिवजयंतीच्या मुहूर्तावर आळंदीत प्रभाग क्र. ६ मध्ये रस्त्याच्या कामाचा शुभारंभ…

शिवजयंतीच्या मुहूर्तावर आळंदीत प्रभाग क्र. ६ मध्ये रस्त्याच्या कामाचा शुभारंभ…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

आळंदी : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या पावन मुहूर्तावर गुरुवार (दि. १९) रोजी प्रभाग क्र. ६ येथे रस्त्याच्या कामाचा शुभारंभ उत्साहात करण्यात आला. या कामामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून पायाभूत सुविधांच्या उभारणीस गती मिळणार आहे.

        या प्रसंगी आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर, नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे पाटील, स्थानिक नगरसेवक सागर कुऱ्हाडे पाटील, नगरसेविका साक्षीताई कुऱ्हाडे पाटील, नगरसेवक गोविंदा कुऱ्हाडे पाटील, माजी नगराध्यक्ष सुरेशकाका वडगावकर, माजी नगरसेवक आनंदराव मुंगसे, माजी नगरसेविका श्रीमती रुख्मिणीताई गोरे, भाजप पुणे जिल्हा सचिव किरण येळवंडे, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष विलास कुऱ्हाडे पाटील, शिवसेना माजी शहराध्यक्ष दिलीप खळदकर, महेश गोरे, सतीष कुऱ्हाडे, शंतनू पोफळे तसेच नगरपरिषदेचे अधिकारी व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

          नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे पाटील यांनी यावेळी सांगितले की, “शिवजयंतीच्या प्रेरणादायी दिवशी विकासकामांची सुरुवात करणे ही अभिमानाची बाब आहे. प्रभाग क्र. ६ मधील रस्त्याचे काम दर्जेदार व वेळेत पूर्ण करून नागरिकांना उत्तम सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न राहील.” मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनीही कामाच्या गुणवत्तेबाबत दक्षता घेण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या. कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. नागरिकांनीही विकासकामाचे स्वागत करत समाधान व्यक्त केले. शिवजयंतीच्या जयघोषात आणि उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रम पार पडला.