बाळासाहेब सुतार
नीरा नरसिंहपुर प्रतिनिधी
सर्वत्र हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, पराक्रमी धर्मवीर राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली.
पिंपरी बुद्रुक व पंचक्रोशीतील नरसिंहपुर, गिरवी, टणु, ओझरे, गोंदी, लुुमेवाडी, सराटी, गणेशवाडी, लिंबोडी, आधी सर्व शासकीय कार्यालयात सर्व ठिकाणी शिवजयंती उत्सव कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
सकाळी नऊ वाजता प्रथम महाराजांच्या पुतळ्याची पुजा सुनील बोडके व बबनदादा बोडके यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून श्रीफळ फोडून पुजा करण्यात आली नंतर सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्या सहित सर्व ग्रामस्थांच्याही हस्ते पूजा व पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी सनिस्का आशोक बोडके या शिवकन्याने शिवगर्जना करीत छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी घोषणा दिली. यावेळी आलेल्या सर्व शिवभक्तांना चहापाणी व महाप्रसाद देण्यात आला.
शाळा–महाविद्यालयांमध्ये शिवचरित्रावर आधारित वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
विविध सामाजिक संघटनांनी शिवाजी महाराजांच्या कार्याचा आणि त्यांच्या आदर्शांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प केला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेतील कार्याचा, त्यांच्या शौर्याचा, न्यायप्रियतेचा आणि स्त्रीसन्मानाच्या धोरणांचा गौरव केला. “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करून सामान्य जनतेत स्वाभिमान आणि सुरक्षिततेची भावना निर्माण केली. त्यांच्या आदर्शांवर चालत समाजात एकता, शौर्य आणि राष्ट्रप्रेमाची भावना जोपासण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.



