Home देशविदेश चिमूर तालुकातंर्गत पोलिस व महसूल अधिकारी,पक्ष पदाधिकारी,लोकप्रतिनिधी सुस्त,अवैध धंदे मस्त…

चिमूर तालुकातंर्गत पोलिस व महसूल अधिकारी,पक्ष पदाधिकारी,लोकप्रतिनिधी सुस्त,अवैध धंदे मस्त…

 चिरफाड…

प्रदीप रामटेके

 मुख्य संपादक

          अधिकारी कसे असावेत व त्यांनी लोकांच्या संरक्षणासाठी कसा अधिकाराचा उपयोग करावा हे चिमूर व भिसी पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना आणि चिमूर एसडिपिओंना माहित असूनही,ते चिमूर तालुकातंर्गत जोमाने सुरु असलेल्या,”सट्टा व अवैध दारू विक्री,अवैध वाळू व मूरुम गौण खनिज उत्खनन, सारख्या अवैध धंद्याकडे कमालीचे दुर्लक्ष करतात हे स्पष्ट आहे.

         तद्वतच चिमूर तहसीलदार व चिमूर उपविभागीय अधिकारी (महसूल) हे वाळू व मुरुम उत्खननाकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करतात.

         यामुळे,”पोलिस अधिकारी व महसूल अधिकारी सुस्त आणि अवैध धंदे मस्त,..असे म्हणण्याची वेळ चिमूर तालुक्यातील महिला व पुरुषांवर आली आहे.

        चिमूर तालुक्यात येणारे पोलिस अधिकारी व महसूल अधिकारी हे आपल्या कर्तव्याप्रती नेहमी सजग व कर्तव्यदक्ष,कर्तव्यक्षम असायचे.

           परंतु सध्यास्थित कर्तव्यात असलेले महसूल अधिकारी व पोलीस अधिकारी हे त्यांच्या कार्यक्षेत्रातील अवैध धंद्याकडे दुर्लक्ष करुन,अवैध धंदेवाईकांना आर्थीक लाभ करुन देत असल्याचे निदर्शनास आले आहे.मात्र अधिकारी हे केवळ अवैध धंदेवाईकांचाच आर्थिक लाभ करतात असेही म्हणता येत नाही.

         यामुळे अवैध धंद्याकडे दुर्लक्ष करणारे पोलीस अधिकारी व महसूल अधिकारी हे स्वत:चा आर्थिक लाभ करत नसतील असे म्हणता येत नाही.”जिथे रुपयांची नशा चढते,तिथे नागरिकांची व खनिज संपत्तीची सुरक्षा वाऱ्यावर सोडली जाते,यासारखे दुर्दैव त्या अधिकाऱ्यांचे दुसरे कोणते असू शकत नाही!… 

        चिमूर तालुक्यात अवैध धंद्यांना रान मोकळे करणारे आणि स्वत:च्या अधिकाराची दररोज पायमल्ली करणारे पोलिस अधिकारी व महसूल अधिकारी यापुर्वी चिमूर तालुक्यात कधीच पाहिले नाही.

         चिमूर तालुक्यात अवैध धंदे जोमाने सुरु असल्याने या तालुक्यातील महिला व पुरुषांना जबाबदार अधिकाऱ्यांकडे बघताना कदाचित लाज वाटत असेल…

         पण,महसूल विभागाच्या व पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या अवैध धंद्याबाबत काहीही वाटत नाही.

        यामुळे चिमूर तालुक्यातील महसूल अधिकारी व पोलीस अधिकारी हे शिरजोर व कर्तव्यहिन झालेच कसे? आणि कुणाच्या आशीर्वादाने झाले,हा मुद्दा अनेक गंभीर प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करणारा ठरणार आहे.

       क्रांतीवीर फिल्ममधील अभिनेता नाना पाटेकर यांचा डायलॉग आठवतो आहे.,”भाड में गयी जनता अपना काम बनता।…”मुर्दो की जिंदगी जिने वाले लोग क्रांती कभीभी नहीं कर सकते।…वे लोग जुल्म और शोषण करणेवालों के गुलाम कहलाते है।….

           यापुर्वीच्या बातम्यांत आलेलेच आहे चिमूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार किर्तीकुमार भांगडिया हे अवैध धंदे कधीच बंद करु शकत नाही…

        कारण त्यांच्या पक्षातील पदाधिकारी व राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी हे मोठ्या प्रमाणात देशी दारुचा पुरवठा चिमूर तालुक्यातील खेड्यापाड्यात करतात.सट्टापटीचा धंदा सुध्दा दोन्ही पक्षांच्या जवळचे लोक करतात तर वाळू व मुरुमांचे मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन आमदारांचे काही पदाधिकारी आणि त्यांच्या जवळील कंपनीचे संचालक करतात…

          याचा अर्थ असा की, पोलिस व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडे सर्व प्रकारच्या अवैध धंदेवाईकांची संपूर्ण माहिती आहे.त्यांच्या नावांची यादी आहे.

       परंतु पक्षाचे पदाधिकारी हे अवैध धंद्यात मोठ्या प्रमाणात गुंतले असल्याने त्यांना आंतरिक संरक्षण देणे आणि त्यांच्या धंद्यांना मार्ग खुले करणे,त्यांना सुरक्षित करणे हे सत्ताधाऱ्यांचे व विरोध पक्षांचे काम असते. 

       यामुळे सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधी,पक्ष पदाधिकारी,इतर पक्षाचे पदाधिकारी आणि महसूल व पोलीस अधिकारी हे संगनमतातून चिमूर तालुक्यात अवैध धंदे सुरु ठेवत आहेत असे लक्षात येते आहे…

          चिमूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार किर्तीकुमार भांगडिया यांना प्रश्र्न आहे की,तुमच्या अधिकारात दम असेल तर तुम्ही चिमूर तालुक्यातील अवैध धंदे बंद करुन दाखवलेच पाहिजे..

    महाराष्ट्रात राज्यासह चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुक्यात मटका,जुगार,ड्रग्स,अवैध दारू विक्री आणि गुटखा यांसारखे अवैध धंदे फोफावले असून,यामुळे तरुण पिढी उद्ध्वस्त होत आहे आणि समाजात गुन्हेगारी वाढत आहे.

           पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे किंवा मिलीभगतमुळे हे धंदे राजरोसपणे सुरू राहतात,ज्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

        या धंद्यांमुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडत असून,महिला सुरक्षिततेचा प्रश्नही गंभीर होत आहे.

        कमी गुंतवणुकीत जास्त नफ्याच्या मानसिकतेमुळे तरुण मटका,जुगार आणि अमली पदार्थांच्या जाळ्यात अडकत आहेत.अवैध धंद्यांमुळे संघटित गुन्हेगारीला खतपाणी मिळत असून शहरासह ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्था बिघडत आहे.

       तद्वतच अवैध धंद्यांमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत.अवैध गुटखा आणि ड्रग्स विक्रीमुळे तरुण पिढीच्या आरोग्याशी खेळ खेळला जात आहे.

            कारवाईतील हलगर्जीपणामुळे पोलिसांच्या प्रतिमेवर डाग लागून लोकांचा प्रशासनावरील विश्वास कमी होत आहे.

       पोलिस प्रशासनाने अवैध धंद्यांविरोधात कडक कारवाई करावी,सामाजिक सुरक्षा विभाग आणि अमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई तेज करावी,बेकायदेशीर कृत्यांमध्ये सामील असलेल्यांवर कठोर कारवाई करावी अशी अपेक्षा लोकांची आहे.

लोकं पोलिस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करू शकतात का?…

        जर पोलिसांचे गैरवर्तन आयपीसी अंतर्गत दखलपात्र गुन्हा असेल,तर तुम्हाला पोलिसांनी एफआयआर दाखल करावा असा आग्रह धरण्याचा अधिकार आहे आणि जर त्यांनी नकार दिला तर तुम्ही कलम १५४ (३) सीआरपीसी [कलम १७३ बीएनएसएस] अंतर्गत पोलिस अधीक्षक किंवा पोलिस आयुक्तांकडे अर्ज करू शकता.

 भारतात पोलिस गैरवर्तन करतात तेव्हा नागरिकांनी काय करायला पाहिजे?

        जर एखादा पोलीस अधिकारी तुम्हाला त्रास देत असेल,तर संबंधित नागरिक हे त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करू शकतात.

          लोक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडे किंवा दंडाधिकाऱ्याकडे तक्रार करू शकतात.मानवाधिकार संरक्षण कायदा,१९९३ नुसार नागरिक राष्ट्रीय मानवाधिकार आयोग (NHRC) किंवा राज्य मानवाधिकार आयोग (SHRC) कडे तक्रार करू शकतात…

भारतात पोलिस अधिकारी नागरिकांना मारहाण करू शकतात काय?

         नाही,नागरिकांना मारहाण करणारा पोलिस अधिकारी नाही! 

            नागरिकांना माहिती आहेच की,कोणत्याही पोलिसाला अटकेचा प्रतिकार करत असेल किंवा पळून जाण्याचा प्रयत्न करत असेल तरच त्यांच्यावर बळाचा वापर करण्याची परवानगी आहे.