प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
विजेच्या खांबावरील इलेक्ट्रिक अल्युनिअम तारांची आरोपी करणाऱ्या पाच पैकी दोन आरोपींना नागपूर जिल्ह्यातील उमरेड पोलिसांनी अटक केली असून बाकीचे आरोपी फरार झाले आहेत.
१) सुंदरसींग हरनामसिंग जुनी वय ४४ वर्षे, २) कुलदिपसींग दर्शनसिंग जुनी वय २९ वर्षे, दोन्ही विडगाव कामठी,३) जितेंद्रकुमार उर्फ जितूफुलचंद चंद्रवंशी वय २६,रा.शिकारीटोला,तह.सुर्या, जिल्हा राजनांदगाव (छतिसगड),४) लक्ष्मण उर्फ डिएम पुर्णवासी बिंद वय २१ वर्ष,रा.पहलादपूर,जि.कैमुरभावुआ (बिहार),दोन्ही राह.बिडगाव कामठी,या चौघां आरोपींना उमरेड पोलिसांनी अटक केली,सध्या ते एमसिआरवर कारागृहात आहेत.
तर श्रिराम रामबच्चन बिंन्द रा.बिहार राज्य हा फरार असून त्या आरोपींचा शोध उमरेड पोलिस घेत आहेत.
तक्रारदार श्री.मिलींद दिगांबर वालदे वय ३६ वर्ष,रा.आंबेक ले-आउट उमरेड हे पाॅलीकॅप कंपनी मध्ये अभियंता म्हणून काम करतात.
सदर कंपनीला महावितरण तर्फे नागपूर जिल्ह्यातील विजेचे खांब उभे करण्याचे व इलेक्ट्रिक अल्युमिनिअम तार जोडणीचे काम मिळाले होते.
उमरेड सब स्टेशन अंतर्गत ठाणा ते नवेगाव (साधु),तिरखूरा ते कऱ्हांडला या ठिकाणी खांबावरील तार लावण्याचे सुरु होते.
दिनांक २३ जानेवारी २०२६ ला फिर्यादी हे ठाणा ते नवेगाव (साधू) येथील काम स्थळावर गेले असता चालु इलेक्ट्रिक लाईनचे २.९ कि.मिटर पर्यंत चे तार चोरीला गेलेले दिसले.या तारांची किंमत १० हजार रुपये आहे.
याचबरोबर फिर्यादी हे तिरखूरा ते कऱ्हाडंला येथील स्थळावर गेले असता बंद लाईनचे ३.३ कि.मी.पर्यंतचे अल्युमिनिअम तार चोरीला गेले असल्याचे आढळून आले.सदर अल्युमिनिअम तारांची किंमत १५ हजार रुपये आहे.दोन्ही मिळून २५ हजारांचा अल्युमिनियम तार चोरांनी चोरुन नेला होता.
अल्युमिनियम तार चोरीच्या संबंधाने उमरेड पोलिस ठाण्यात इंजिनिअर मिलिंद दिगांबर वालदे यांनी तक्रार दाखल केली.त्यांच्या तक्रारी नुसार चोरीचा गुन्हा भांदवी कलम ३०३ (२) नुसार दाखल करण्यात आला.सदर गुन्ह्याचा अपराध क्रमांक ७५३/२०२५ आहे.
सदर आरोपींवर,उमरेड नागभिड,पवनी,बुटेबोरी,भिवापूर,कुही,कोंढाळी,भंडारा,येथे ११ वेळा चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

